fbpx

मदत मागताना वाटणारा संकोच कसा दूर करावा ?

आपण मानसिक तणावात असताना लोकांनी आपल्याला समजून घ्यावं, आपल्या सोबत राहावं आणि आपले मनोबल वाढवावे असे अनेकांना वाटते. पण बऱ्याच लोकांना मदत स्वीकारताना कमालीचा कमीपणा वाटतो, त्यांची चिडचिड होते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो म्हणून त्यांची प्रतिक्रिया द्यायची पद्धत देखील वेगळी असते.

आपण लहान असताना आपल्याला एक गोष्ट शिकवलेली असते ती म्हणजे आपण कुणाकडून मदत मागणे कमी पणाचे लक्षण आहे, मदत मागितली की दुसऱ्यांना आपले ओझे वाटू लागेल आणि ते आपल्याला कमजोर समजतील, judge करतील. या समजुतीमुळे आपण जेव्हा कुणी आपल्याला मदत करायला येते तेव्हा चुकीच्या पद्धतीने रिस्पॉन्स देतो.

मदत स्वीकारणे कठीण का वाटते ?

मदत स्वीकारताना सर्वात आधी आपल्याला जुने अनुभव आठवतात. आपण ज्या व्यक्ती कडून पूर्वी मदत घेतली होती त्यांनी आपल्याला कसे वागवले यावर बरेच काही अवलंबून असते. त्याच बरोबर आपली early attachment देखील खूप महत्त्वाचा भाग आहे. जर लहानपणी attachment कमी असेल तर मग व्यक्तीवर विश्वास ठेवणे कठीण जाते, जर पालकांकडून योग्य प्रेम, माया मिळाली नसेल तर मदत स्वीकारताना आपण दुःखी आणि कन्फ्युज असतो.

आपण सर्वच गोष्टी स्वतः करू शकत नाही हे स्वीकारणे कठीण असते, आपल्याला कुणाची गरज आहे या भावनेतून अनेकदा लज्जा उत्पन्न होते. लहानपणी जर आपल्या गरजांना योग्य लक्ष दिले गेले नाही, हवा तसा आधार मिळाला नाही की मग आपण मोठे होताना जगावर विसंबून राहणे टाळतो, Self- sufficient होत जातो. पुढे याच स्वभावामुळे त्यांना मदत मागताना संकोच वाटतो आणि आपण खूपच काही मागत आहोत असा समज होऊन बसतो.

उदा. जर मुलांना गरज असताना पालक त्यांना avoid करत असतील किंवा योग्य आधार देत नसतील तर मुले स्वतःला दोष देतात आणि आपण जास्त अपेक्षा करत आहोत असे ठरवतात. ( पालकांची image hero ची असते म्हणून लहान मुले स्वतःला दोष देतात.)

मदत मागताना वाटणारा संकोच कसा दूर करावा ?

मदत स्वीकारणे किंवा मागणे अजिबात चुकीचे नाही तर ते एक survival स्किल आहे हे समजून घेणे खूपच महत्वाचे आहे, मदत मागताना येणारा संकोच दूर करायचा असेल तर सर्वात आधी मदत मागणे म्हणजे कुणावर ओझे बनणे किंवा त्यांना त्रास देणे आहे हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.

मदत स्वीकारण्यासाठी आपण आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार समजून घेणे गरजेचे आहे. मदत मागताना मनात अनेक विचार येतात जसे
✳️ मला कुणाचीच मदत नको आहे.
✳️ मी काही मोठे काम करत नाहीये.
✳️ मला कुणावर ओझे व्हायचे नाहीये.
✳️ आपण दुसऱ्यावर का विसंबून रहायचे.
✳️ आपण मदत मागून दुसऱ्यांना का त्रास देत आहोत.
✳️ मदत घेतली तर आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल.
हे सर्व आपल्या मनातील नकारात्मक विचार असतात, आपल्याला मदत करणारी व्यक्ती कधीच असा विचार करत नसते.

आपला भूतकाळ स्वीकारा – आधीच सांगितल्या प्रमाणे भूतकाळात आलेले अनुभव आपल्याला मदत स्विकारण्यापासून दूर करत असतात. आपल्या सोबत भूतकाळात जे काही झाले आहे ते स्वीकारले आणि सगळेच व्यक्ती सारखे नसतात हे पटवून घेतले की आपल्याला मदत स्वीकारणे सोपे होते.

मदत स्वीकारणे हे स्वार्थीपणाचे लक्षण नसून प्रेम किंवा मैत्रीच्या नात्याला अधिक बळकट करणारी गोष्टी आहे हे समजून घेणे आणि घनिष्ट संबंध प्रस्थपित करणे हा सकारात्मक बदल स्वतःमध्ये करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण अडचणी मध्ये असताना आपल्या लोकांना लांब ठेवतो तेव्हा त्यांच्या मनात देखील आपल्या बद्दल दुरावा निर्माण होतो, त्यामुळे नाते दृढ होण्यासाठी मनात असलेल्या सर्व भावना बोला आणि संकोच ठेऊ नका. आपण जेव्हा मदत स्वीकारतो आणि कुणाला मदत करतो तेव्हा आपले संबंध अजून मजबूत होतात आणि आपली हक्काची support system निर्माण होते. मग मदत करणे आणि मागणे स्वाभाविक होते.

जोपर्यंत आपण मोठ्या मनाने मदत स्वीकारत नाही तोवर तितक्याच मोठ्या मनाने मदत आपण करू शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.