fbpx
images.jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

आयटी मध्ये कामाला आहे, खूप स्ट्रेस असायचा म्हणून स्मोकींग आणि drinking सुरू झाले आणि आता रोज किमान 2 सिगरेट smoke केल्या नाहीत तर अंग दुखत आणि एकदम नीरस वाटू लागत, उगाच सर्वांवर चिडचिड होते. महिन्यातून 4 -5 वेळा वेगवेगळ्या लोकांच्या तोंडून हे वाक्य कानी पडतच. अगदी सहज म्हणून सुरू झालेली गोष्ट व्यसनात कधी रुपांतरीत होते हे कळत नाही, व्यसन या संकल्पनेबाबत अनेक गैरसमज आहेत. आज याविषयी अधिक माहिती घेऊ.

व्यसन म्हणजे काय ?

एखादा मादक पदार्थ किंवा सवय ज्याचे सेवन केल्या शिवाय चैन मिळत नाही किंवा अस्वस्थ वाटते तेव्हा त्याला आपण व्यसन म्हणतो, व्यसनाचे दुष्परिणाम माहीत असून सुद्धा तीच गोष्ट पुन्हा करायची इच्छा आपल्याला होते तेव्हा आपण व्यसनाधीन होत आहोत हे लक्षात घ्यावे. व्यसन करणे म्हणजे दारू, सिगरेट, गांजा, कोकेन ई .मादक पदार्थांचे सेवन करणे किंवा जुगार, मटका, सट्टा खेळणे.

व्यसनाचा संबंध हा आपल्या न्युरो बायोलॉजीशी आहे. कोणतीही नशा आपल्या मेंदू मधील reward सर्किटशी संबंधित असते, नशा केल्यानंतर मेंदू मध्ये 2 मुख्य बदल होतात.
 • Dopamine हे हार्मोन स्त्रवले जाते, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि motivated फील होते.
 • मेंदूच्या prefrontal कॉर्टेक्स ( सर्वात क्रियाशील भाग) मधील न्युरोनचे कनेक्शन कमकुवत होते. त्यामुळे सर्व लक्ष मादक पदार्थ किंवा कृती कडे आकर्षित होते.
मेंदू मध्ये होणारे बदल हे कायमस्वरूपी नसतात, नशा बंद केल्यानंतर prefrontal कॉर्टेक्स मधील न्युरोनचे कनेक्शन पुन्हा तयार होतात.

व्यसनाचे वर्गीकरण 2 भागात केले जाते.
 • Substance use disorders – मादक पदार्थांचे सेवन जसे दारू, ड्रग्स, निकोटिन, कॅफेन .
 • Gambling behaviors – जुगार, मटका किंवा सट्टा

दोन्ही व्यसनात स्ट्रेस, डिप्रेशन आणि anxiety तसेच अनेक मानसिक आजार निर्माण व्हायची दाट शक्यता असते. दोन्ही प्रकारांचे मेंदूवर सारखेच परिमाण होतात आणि यांसाठी उपलब्ध ट्रीटमेंट सुद्धा एकमेकांशी साधर्म्य ठेऊन असतात.

व्यसन ही एक गुंतागुंतीची स्थिती आहे जीचा परिमाण reward, motivation आणि मेमरी या मेंदूच्या मुख्य क्रियांवर होतो. व्यसनामुळे रोजच्या छोट्या छोट्या activity, सामाजिक आयुष्य, नातेसंबंध यांवर प्रभाव पडतो. व्यसनाबद्दल सर्वात हानिकारक गोष्ट म्हणजे तिचे शारीरिक आणि मानसिक तोटे माहीत असून सुद्धा नशा करायची सवय सहसा सुटत नाही. नशा करणाऱ्या व्यक्तीची capacity सवयीने वाढत जाते. म्हणजे पूर्वी 2 पेग मध्ये high होणारी व्यक्ती कालांतराने 4 पेग पर्यंत व्यवस्थित असते.

व्यसनामुळे मेंदूच्या prefrontal कॉर्टेक्स वर परिमाण होतो, त्यामुळे नशेत असताना आपल्या वागणुकीमुळे स्वतःला आणि दुसऱ्यांना त्रास होत आहे हे व्यक्तीच्या लक्षात येत नाही, कालांतराने व्यक्ती स्वतःचे अस्तित्व विसरून पूर्णपणे नशेच्या आहारी जाते.

व्यसनाधीनतेचे symptoms-
कोणत्याही पदार्थाचे आपल्याला त्रास होत असताना सुद्धा सेवन करणे हे सर्वात मोठे लक्षण आहे, पण क्लिनिकल diagnodis साठी खालीलपैकी 2 लक्षणे असते गरजेचे असते.
 • काही औषधे किंवा तत्सम गोष्टींचे डॉक्टर ने सांगितलेल्या कालावधी पेक्षा जास्त सेवन करणे.
 • नशा करताना उद्यापासून बंद करणार असा पूर्ण न होणारा निश्चय करणे.
 • तलफ – पदार्थाचे सेवन करायची हुक्की येणे, त्याशिवाय चैन न पडणे.
 • जागेचे भान न ठेवता मादक पदार्थाचे सेवन करणे.
 • समाजात वावर कमी करणे, एकटे राहणे किंवा व्यसन करणाऱ्या लोकांसोबत राहणे पसंत करणे.
 • नशेचे प्रमाण वाढणे / डोस वाढवणे, पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात व्यसन करणे.
 • जास्तीत जास्त वेळ नशा करणे.
 • नशा न केल्यास मुंग्या येणे, हात पाय लटपटयला लागणे.
 • नशा न केल्यास चिडचिड होणे, भूक कमी होणे/ खूप वाढणे.
व्यसनाची पातळी ही symptoms वरून ठरवली जाते, जितके symptoms जास्त तेव्हढी advance स्टेज.

व्यक्ती व्यसनाधीन का होते ?
अनेक रिसर्च सांगतात की व्यसन कसे होते किंवा कोणती व्यक्ती व्यसनाधीन होईल हे सांगणे कठीण आहे, व्यसन ही बहु आयामी परिस्थिती आहे, एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीच्या संपर्कात येणे हे व्यसनाधीन होण्याच्या रस्त्यातील पाहिले पाऊल आहे.

Biological factors
 • Genes – काही रिसर्च सांगतात की व्यसन हे जनुकीय सुद्धा असू शकते, ज्यांच्या परिवारात व्यसनाचा इतिहास आहे अशा व्यक्तींमध्ये reward receptors ची रचना ही त्यांच्या आधीच्या पिढी प्रमाणे असू शकते ज्याने व्यसनाचा धोका वाढतो.
 • Physiology – लिव्हर मध्ये असलेले enzyme जे मादक पदार्थांचा चयपचय ( metabolis) सांभाळतात त्यांची मात्रा योग्य असल्यास शरीराची त्यांना सहन करण्याची capacity वाढते.

Psychological Factors
 • Personality Disorder – Impulsive ( आवेगात येणारे) आणि sensation सीकर ( ज्यांना थ्रील अनुभायचे असते असे) लोक सहज व्यसनाधीन होतात.
 • ट्रॉमा अनुभवलेले लोक हे सेल्फ esteem कमकुमत असल्याने लवकर व्यसनाधीन होऊ शकतात.
 • स्ट्रेस, डिप्रेशन, anxiety किंवा तत्सम आजार असणारे लोक हे तात्पुरत्या आनंदासाठी नशा सुरू करतात आणि मग व्यसन सुरू करतात.

Environmental Factors-
 • परिवारात कुणी नशा करत असेल तर कुतूहल निर्माण होते आणि त्या दिशेने वाटचाल सुरू होते. परिवारात जर कलह असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा घटस्फोट, वाद विवाद यांवर तात्पुरता इलाज म्हणून व्यसनाकडे पाहिले जाते.
 • घरात जर दारू किंवा मादक पदार्थ सहज उपलब्ध असतील तर त्यांचे सेवन करणे सामान्य असते. ज्यांच्या घरी दारू सतत उपलब्ध असते ते सहज दारू चे सेवन सुरू करतात.
 • आपल्या भोवतालच्या लोकांच्या प्रेशर मुळे किंवा फोमो मुळे सुद्धा लोक व्यसनाधीन होऊ शकतात.

व्यसनाधीनतेवर उपलब्ध ट्रीटमेंटव्यसन पूर्णपणे दूर करता येते, पण त्यामुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. अनेकदा व्यक्ती अर्ध्यातच पुन्हा व्यसनाकडे वळते. योग्य ट्रीटमेंट मध्ये नशेचा प्रतिबंध आणि त्यांच्या पुनर्वापर होऊ नये म्हणून नियोजन करणे यांचा अंतर्भाव असतो.

व्यसन पूर्णपणे दूर करता येते, पण त्यामुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. अनेकदा व्यक्ती अर्ध्यातच पुन्हा व्यसनाकडे वळते. योग्य ट्रीटमेंट मध्ये नशेचा प्रतिबंध आणि त्यांच्या पुनर्वापर होऊ नये म्हणून नियोजन करणे यांचा अंतर्भाव असतो.

व्यसनामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते, त्यामुळे ट्रीटमेंट मध्ये यांच्यावर जास्त लक्ष दिले जाते. प्रत्येक ट्रीटमेंट मुळे 100% रिझल्ट मिळतीलच असे नाही, त्यामुळे खूप संयम ठेऊन सर्व काम करावे लागते.

ट्रीटमेंट मध्ये पुढील घटकांचा समावेश असतो, व्यसनाच्या तीव्रतेनुसार किती घटक कसे वापरायचे हे ठरवले जाते.
 • Detoxification ही पहिली पायरी असते, औषधे वापरून शरीरातील टॉक्सीन बाहेर काढले जातात.
 • औषधे – मादक पदार्थांचा शरीरावर झालेला परिमाण भरून काढण्यासाठी अनेकदा औषधे दिली जातात.
 • संवाद – व्यसनाधीन व्यक्ती आणि थेरपिस्ट / डॉक्टर यांचा संवाद ट्रीटमेंट मधील सर्व शंका दूर करण्यासाठी महत्वाचा ठरतो.
 • Cognitive Behavior Therapy (CBT) – या टॉक थेरपी चा वापर करून नशे चे ट्रिगर ओळखता येतात आणि त्यावर उपाय करणे सोपे जाते.
 • ग्रुप थेरपी – समूहात मार्गदर्शन आणि काही लोकांचे अनुभव अशा मिश्र पद्धतीने व्यक्तीला व्यसनापासून परावृत्त केले जाते.
 • Life skills training – व्यसनाधीन व्यक्तीला महत्वाचे स्किल शिकवले जातात जेणेकरून त्याला नोकरी/ व्यवसाय करता येईल आणि तो परावृत्त होईल.
सर्व ट्रीटमेंट मध्ये व्यक्तीची डेव्हलपमेंट सतत पहिली जाते आणि त्यानुसार पुढील प्लॅन ठरवला जातो.

याची ट्रीटमेंट ही डॉक्टर, कौन्सेलर, सेल्फ हेल्प ग्रुप, व्यसनमुक्ती केंद्र अश्या वेगवेगळ्या ठिकाणी घेता येते. प्रत्येकाची मानसिकता पाहून त्याला कोणता मार्ग योग्य राहील हे ठरवले जाते. प्रत्येक ट्रीटमेंट मध्ये पुढील बाबी महत्त्वाच्या असतात.
 • पेशंटचे मेडिकल आणि psychiatric स्क्रिनिंग.
 • व्यक्ती नुसार customize प्लॅन.
 • परिवाराचा सहभाग.
 • एक चांगले वातावरण आणि सकारात्मक विचार.
 • पेशंट चा रिस्पॉन्स आणि त्यावरून पुढील प्लॅन ठरवणे.

व्यसनाधीन व्यक्ती साठी जेनरिक ट्रीटमेंट उपलब्ध नसते, त्या व्यक्तीची मानसिक परिस्थिती खूप महत्वाची असते त्यामुळे व्यक्ती नुसार ट्रीटमेंट ठरवली जाते. या वेळी सर्व माहिती गुप्त ठेवली जाते आणि पेशंट साठी सकारात्मक वातावरण निर्माण केले जाते.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.