fbpx

थेरपी बद्दल बोलू काही

मानसिक त्रासात असताना अनेकदा थेरपी घ्या असा सल्ला दिला जातो, पण थेरपी म्हणजे काय ?, आपल्याला खरच त्याची गरज आहे का ?, चांगला थेरपिस्ट कशा शोधावा ?, आपल्यासाठी योग्य थेरपी कोणती ? असे अनेक प्रश्न रोज बरेच लोक विचारतात. थेरपी बद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. आज याच विषयावर आपण थोडक्यात माहिती घेऊ.

थेरपी म्हणजे काय ?

थेरपी ( psychotherapy / talk therapy) म्हणजे मानसिक त्रासात असणाऱ्या व्यक्तीला योग्य प्रकारे समजून आणि ऐकून घेऊन, त्याचा तणाव आणि त्रास कमी करण्यासाठी आखली गेलेली एक परिपूर्ण उपचार पद्धती. योग्य प्रशिक्षण घेतलेले psychiatrist, psychologist, समाज सेवक आणि लायसेन्स असलेले समुपदेशक हे थेरपी देऊ शकतात. थेरपी मध्ये पीडित व्यक्ती आणि थेरपिस्ट हे दोघे किंवा पीडित व्यक्तीचा परिवार सुद्धा समाविष्ट असू शकतो.

मला थेरपीची आवश्यकता आहे का ?

आपल्या समस्या व्यवस्थित आणि कोणत्याही जजमेंट शिवाय ऐकून घेऊन त्यावर उपाय सांगणारे व्यक्ती सर्वांनाच हवे असतात परंतु थेरपी चे शुल्क, लोक काय म्हणतील ही भीती आणि एखाद्या अनोळखी व्यक्ती समोर मन मोकळे करणे हे सर्वांना सोयीचे वाटत नाही त्यामुळे हा पर्याय लोक सहसा स्वीकारत नाहीत.

आपले मित्र किंवा परिवारात असलेले लोक हे अनेकदा एकाच बाजूने विचार करून सल्ले देतात आणि अनेकदा जजमेंटल होतात त्यामुळे काय करावे हे आपल्याला सुचत नाही. मग आपण इकटे पडत जातो.

आपल्याला थेरपीची आवश्यकता आहे की नाही हे ठरवणे सोपे आहे, जेव्हा आपल्याला खूपच दुःखी, उदास आणि निराश वाटत असेल, कोणताच पर्याय सहज सुचत नसेल तेव्हा भावनिक आधारासाठी आपण थेरपिस्ट कडे जाऊ शकतो. अनेकदा relationship प्रॉब्लेम, करियर किंवा कामाच्या ठिकाणी हातातून निसटून गेलेली संधी किंवा कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे निधन अश्या प्रसंगी कसे वागावे ते कळत नाही, आपण समाजापासून तुटत जातो, अश्यावेळी निसंकोच थेरपी हा पर्याय निवडावा.

थेरपिस्ट योग्य आहे हे कसे ओळखावे ?

जगात खूप उत्तम थेरपिस्ट आहेत, पण आपल्या भागातील थेरपिस्ट हे तज्ञ असतीलच असे नाही, चुकीचा थेरपिस्ट निवडल्यास रुग्ण आणि त्याचा परिवाराला अनावश्यक त्रास होतो. त्यामुळे थेरपिस्ट शोधताना चिकित्सा करणे उत्तम असते. फॅमिली डॉक्टर करून सल्ला घेणे हिताचे ठरते त्याच सोबत थेरपिस्ट चे रिव्ह्यू आणि इतर लोकांकडून सल्ला घेणे केव्हाही चांगले.

मी माझ्या परिवारातील किंवा प्रिय व्यक्ती साठी थेरपिस्ट शोधू शकतो का ?

आपल्या जवळच्या व्यक्तीला त्रासात पाहून आपल्याला देखील खूप त्रास होतो, अश्यावेळी त्यांच्यासाठी काहीतरी करावे असा आपला मानस असतो पण थेरपी फोर्स करून काहीच फायदा होत नाही, समोरच्या व्यक्तीला तुम्ही convince करू शकता आणि थेरपी कशी योग्य आहे हे पटवून देऊ शकता किंवा थेरपिस्ट सोबत एक भेट करून देऊ शकता ज्यामुळे ते मानसिक रित्या तयार होतील आणि त्यांना फायदा होईल.

माझ्यासाठी कोणती थेरपी योग्य आहे ?

मानसिक समस्या आणि त्रास कमी करण्यासाठी अनेक थेरपी उपयुक्त सिद्ध झाल्या आहेत,  आपल्यासाठी कोणती थेरपी उत्तम असेल हे थेरपिस्ट आपले निरीक्षण करून ठरवतात. अनेक कॉमन आजारांसाठी ठराविक थेरपी सुद्धा आहेत, अनेकदा थेरपिस्ट हे वेगवेगळ्या थेरपी मध्ये तज्ञ असतात ते आपल्या पद्धतीच्या वापरणे समस्या सोडवतात.

थेरपी खूपच महाग असते का ?

कोणत्याही वस्तू किंवा सेवेची किंमत ही अनेक बाबींवर अवलंबून असते, पण थेरपी मुळे आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते त्यामुळे खरे तर ती अमूल्य आहे. आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये देखील मानसिक त्रासांना कव्हर करणारी पॉलिसी घेऊ शकतो. साधारण फी ही 45 मिनिटाच्या सेशन साठी 500 ते 3000 रुपये असू शकते. समस्या किती जटील आहे यावर सेशन ची संख्या अवलंबून असते.

थेरपी सेशन कसे असतात ?

थेरपिस्ट ची पहिली भेट ही नेहमी कठीण आणि खूपच नर्व्हस करणारी असते. आपली anxiety खूप वाढू शकते, आत्ता लगेच घरी जावे किंवा निर्णय बदलावा असे वाटू शकते. परंतु अश्या वेळी संयम ठेवणे फार आवश्यक असते. पहिल्या सेशन मध्ये साधारण क्लाएंटचा भूतकाळ, त्यांच्यासोबत झालेल्या घटना आणि त्यांच्या जीवनाकडे तसेच स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोन यावर लक्ष दिले जाते. नंतरचे सत्र हे व्यक्तीला कसली गरज आहे त्यानुसार प्लॅन केले जातात.

थेरपिस्ट औषदे सुद्धा देतात का ?

डिप्रेशन, bipolar disorder आणि anxiety अशा आजारात औषधं आणि Psychotherapy सोबत घेतले जातात, पण सर्वांनाच हे लागू होते असे नाही, थेरपिस्ट रुग्णाचे परीक्षण करून औषधे सुचवू शकतात.

थेरपिस्ट कसा नसावा ?

जर तुमचा थेरपिस्ट पुढील गोष्टी करत असेल तर तो तुमच्यासाठी योग्य नाही हे लक्षात घ्यावे.
✳️ थेरपिस्ट तुमचे बोलणे ऐकून घेत नाही.
✳️ तुम्हाला मध्येच थांबवून स्वतः खूप जास्त बोलतात.
✳️ तुम्हाला judge करतात.
✳️ तुमची खिल्ली उडवतात किंवा तुम्ही खोटे बोलत आहात असे दर्शवतात.
✳️ तुमचे बोलणे ऐकायचा कंटाळा करतात
✳️ 45 मिनिटे पूर्ण साली की तुम्हाला मध्येच तोडून सेशन संपले म्हणून घोषित करतात.
✳️ तुमची महत्वाची माहिती परवानगी शिवाय बाहेर leak करतात.

थेरपीचे शेवटचे सत्र कधी असते ?

थेरपी सुरू करताना त्याचा उद्देश काय असणार आहे हे ठरवलेले असते, जेव्हा तो उद्देश साध्य होतो तेव्हा थेरपी थांबवली जाते. उदा. एखाद्याला पाण्याची भीती असेल (hydrophobia) असेल तर ज्या दिवशी ती भीती संपेल तो थेरपीचा शेवटचा दिवस असतो.

काही वेळा काही कारणांनी थेरपिस्ट ना continue करणे शक्य नसेल तर ते केस दुसऱ्या थेरपिस्ट ना हस्तांतरीत करतात.

थेरपी घेणे हे अजिबात चुकीचे नाही, जसे ताप किंवा सर्दी मध्ये आपण डॉक्टर कडे जितक्या सहज जातो तितकेच सहज आपण थेरपिस्ट कडे जाऊ शकतो.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.