fbpx

विचार करा तुम्ही खूप स्ट्रेस मध्ये आहात, प्रयत्न केले तरीही यावर नियंत्रण मिळवता येत नाहीये आणि मी तुम्हाला एक music पाठवले आणि earphone/ headphone द्वारे ते ऐकायला सांगितले, थोड्या वेळाने तुम्हाला फ्रेश वाटू लागले आणि स्ट्रेस कमी झाला तर ? आपण ध्यान किंवा Meditation चा वापर आपला स्ट्रेस कमी करायला, फोकस वाढवायला, शांत झोप येण्यासाठी, मूड फ्रेश होण्यासाठी आणि आपले मानसिक दुःख कमी करण्यासाठी करतो, पण हेच फायदे आपल्याला एका लयबद्ध संगीतातून मिळू शकतात. याच लयबद्ध संगीताला Binaural Beats म्हणतात.

Frequency मध्ये थोडासा फरक असलेले दोन वेगवेगळे tones जेव्हा वेगवेगळ्या कानाद्वरे ऐकले जातात तेव्हा आपला मेंदू त्या दोन्ही frequency मधील फरक लक्षात घेऊन एक नवीन tone निर्माण करतो, हे ऑडियो illusion म्हणजेच Binaural Beat. उदा. एखाद्या music मध्ये उजव्या कानात tone frequency 405 Hz आहे आणि तीच दुसऱ्या कामात 415 Hz आहे तर तयार होणारी Binaural Beat frequency ही 10 Hz असते.

Binaural Beats कसे काम करतात ?

Binaural Beat निर्माण होण्यासाठी उपलब्ध दोन्ही tones ची frequency ही 1500 Hz पेक्षा कमी हवी आणि दोन्ही मधील फरक देखील जास्तीत जास्त 40 Hz हवा. Binaural Beat मुळे होणारा प्रभाव हा तिच्या frequency आणि तिच्याशी संबंधित ब्रेन waves यांवर अवलंबून असतो.

Waves चे प्रकार

✳️ Alpha waves ( 8 ते 12 Hz) – या ब्रेन waves आपल्या मनाच्या रिलॅक्स स्टेटशी निगडित आहेत. आपण डोळे बंद केले की या waves जागृत होतात, नियमित ध्यान करणाऱ्या लोकांना याचा प्रभाव लवकर जाणवतो. या waves मुळे आपली झोप, relaxation तसेच anxiety नियंत्रित होते. झोपेची REM म्हणजेच रॅपिड आय movement ही स्टेज या waves शी निगडित आहेत.

✳️ Beta waves ( 12.5 ते 30 Hz) – याचे 3 उपप्रकार आहेत, Low Beta, Beta & High Beta. Beta Waves या जागरूकता, एकाग्रता, प्रोब्लेम solving, फोकस पॉवर यांशी निगडित असतात. व्यक्ती जागृत अवस्थेत असताना दैनंदिन कामे योग्य प्रकारे करणे हे या waves चे काम आहे, जर ह्यांची कमतरता असेल तर व्यक्तीला डिप्रेशन, निद्रानाश आणि ADD असे मानसिक आजार होऊ शकतात.

✳️ Theta waves ( 4 ते 8 Hz) – या frequency आपल्या memory, भावना, झोप, ध्यान, संमोहन, neural plasticity यांच्याशी निगडित आहेत, सोप्या भाषेत या waves मुळे आपल्याला झोप लागते. आपल्या भावना आणि त्यातून सुंदर स्मृती ( मेमोरिज) तयार करण्याचे महत्त्वाचे काम या waves करतात. या waves lighter stage sleep शी संबंधित आहेत.

✳️ Delta waves ( 0.5 ते 4 Hz) – याचे 3 उपप्रकार आहेत Low, Slow & Deep.  या सर्वात स्लो ब्रेन waves आहेत, ज्यांच्या संबंध तिसऱ्या आणि चौथ्या झोपेच्या स्टेजशी आहे. या waves मुळे आपल्याला Relaxation ची सर्वोच्च पातळी अनुभवता येते या झोपला healing स्लीप देखील म्हणतात. यांची कमतरता असल्यास पुरेशी झोप घेऊन सुद्धा आपल्याला थकवा जाणवतो.

Binaural Beats आणि Brain waves यांचा संबंध

एखाद्या व्यक्तीला जर 5 Hz frequency मधील Binaural Beat ऐकायला दिली तर त्या व्यक्तीच्या brain waves देखील theta wave स्टेट मध्ये येतात आणि त्याला रिलॅक्स वाटते आणि हळू हळू झोप येऊ लागते.

Entrainment प्रक्रिया – बाहेरील म्हणजेच कानावर येणारे Binaural Beat आपल्या brain waves ना अल्टर करतात आणि हळूहळू आपल्या brain waves देखील Binaural Beat च्या frequency सोबत मॅच होतात याच प्रक्रियेला Entrainment म्हणतात. याच प्रक्रियेमुळे Binaural Beat एकल्या नंतर आपली मानसिक स्थिती बदलते.

Binaural Beats किती effective आहेत ?

ही पद्धती खूपच नवीन असल्याने आणि कमी लोकांवर प्रयोग झाल्याने सांख्यिकी माहिती कमी प्रमाणात उपलब्ध आहे, पण अनेक रिसर्च नुसार याचे साईड इफेक्ट खूपच कमी आहेत. अनेक प्लॅटफॉर्म वर Binaural Beats मोफत उपलब्ध आहेत. मी सुद्धा माझ्या अनेक थेरपी मध्ये meditation सोबत Binaural Beats वापरतो. तसेच Science Beyond Science मध्ये 6 ते 12 वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या एका कोर्स चा पाया देखील Binaural Beats आहे.

Binaural Beats चा वापर करून आपण High फील करू शकतो का ?

गेल्या दशकात I-dosing किंवा डिजिटल ड्रग ही संकल्पना खूपच प्रसिद्ध झाली आहे, विशिष्ठ हेतू ने निर्माण केलेले Binaural Beat ऐकून व्यक्तीला चरस, गांजा, LSD, अफिम, कोकेन असे ड्रग्स घेतल्यानंतर येणारा HIGH अनुभव येऊ शकतो. Binaural Beats मेंदू मधील relaxing waves align करतात म्हणूनच HIGH EXPERIENCE आपल्याला येतो. पण यावर अजून संशोधन सुरू आहे.

Binaural Beats चा मानसिक स्वास्थ्य आणि मानसोपचारासाठी वापर

जेव्हा Binaural Beats चा वापर योग्य पद्धतीने केला जातो तेव्हा मेंदू चे नियंत्रण करणे सोपे जाते, मेंदूच्या वाढलेल्या waves कमी करण्यासाठी यांचा वापर केला जाऊ शकतो. उदा. स्ट्रेस मुळे झोप कमी झालेल्या व्यक्तीला योग्य frequency चे Binaural Beat ऐकवून त्याला रिलॅक्स करता येऊ शकते. एका स्टडी नुसार Brainwaves चे पॅटर्न बदलल्यामुळे hormonal बदल देखील होतात. Melatonin ची पातळी वाढते, cartisol कमी होते त्यामुळे व्यक्तीला रिलॅक्स वाटते, मूड बदलतो आणि anxiety कमी होऊन फोकस करणे शक्य होते, झोप देखील नियंत्रित होते.

गेले 7 वर्ष मी याच Binaural Beats वापरून अनेक विद्यार्थी आणि क्लाएंट मध्ये असणारे anxiety, ADD – attention deficiency disorder, निद्रानाश यशस्वीरित्या हाताळले आहेत.

तुम्हाला ही काही समस्या असतील तर मला संपर्क करा परंतु गूगल किंवा अन्य कोणत्याही सोर्स द्वारे मनाने Binaural Beats शोधून स्वतःवर किंवा कुणावर प्रयोग करू नका. 

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.