fbpx

जुनाट आजार (Chronic illness) आणि आत्महत्येचा विचार

सप्टेंबर महिना Suicide Prevention Awareness Month म्हणून साजरा केला जातो, आत्महत्या हा एक जटील पण महत्वाचा विषय आहे, एका संशोधनानुसार गेल्या काही वर्षात chronic illness (जुनाट आजार) मुळे आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कुणाला chronic illness मुळे हे जीवन संपवून टाकायची इच्छा होत असेल तर नक्कीच समुपदेशकांची मदत घ्या. तुम्ही या परिस्थिती मधून जात नसाल तरीही हे मुद्दे नक्की समजून घ्या म्हणजे गरज पडल्यास कुणाला मदत करता येईल.

आत्महत्येचा विचार येण्याची कारणे –

✳️ Chronic illness
जुनाट आजार म्हणजे किमान 1 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून असणारे आजार, जर एखाद्या व्यक्तीला आजार खूप दीर्घ काळापासून असेल आणि त्यामुळे त्याला खूप त्रास होत असेल तर डिप्रेशन आणि आत्महत्येचा धोका संभवतो.

✳️ Social Disconnection
शारीरिक किंवा मानसिक आजारपणामुळे व्यक्ती एकटे राहणे पसंत करते, काही आजारांची लक्षणे एवढी तीव्र असतात की व्यकीचे खाजगी आणि सामाजिक आयुष्य डिस्टर्ब होते. तिला शाळा, कॉलेज, ऑफिस, लग्न समारंभ कुठेच जाता येत नाही त्यामुळे तिचा समाजाशी असलेला संपर्क तुटतो. एकटे असल्याने नकारात्मक विचार जास्त प्रमाणात येतात. हेच लोक मग एकटेपणा संपवण्यासाठी मग आत्महत्येचा विचार करू लागतात.

✳️ ओझे असल्याची भावना
आपल्या आजारपणामुळे आपण आपल्या कुटुंबावर ओझे झाले आहोत अशी भावना देखील आत्महत्येचे कारण बनू शकते. आपल्या आजारपणामुळे आपल्या परिवाराला विनाकारण त्रास होत आहे हा विचार सतत मनात निराशा उत्पन्न करतो आणि आत्महत्या हाच सर्वांना ह्या त्रासातून मुक्त करण्याचा मार्ग आहे असा समज होतो.

✳️ परिवाराच्या नकारात्मक भावना.
जुनाट आजार असलेल्या व्यक्ती सोबत त्याचा पूर्ण परिवार स्ट्रेस मध्ये असतो, ते देखील त्रास सहन करत असतात . आजारी व्यक्तीला होणाऱ्या खर्चाचे किंवा परिवाराला होणाऱ्या त्रासाचे टोमणे ऐकायला मिळाले की तिचे मन निराश होते आणि मी मेलो तर बरे होईल अशी भावना मनात येते. त्यामुळे आत्महत्या करून ही कटकट थांबवावी असे विचार मनात येतात.

✳️ निराशा आणि असहायता
Chronic illness मुळे व्यक्तीमध्ये आपण कधीच बरे होणार नाही किंवा यावर काही उपाय नाही आहे अशी निराशा जन्माला येते तर आपल्या हातात काहीच नाहीये, ही परिस्थिती अशीच राहणार आहे असे नकारात्मक विचार येतात. दोन्ही विचार हे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे मुख्य घटक बनू शकतात.

✳️ स्वतःवर टीका / critisize करणे
आपण आपली एक जीवनपद्धती ठरवलेली असते पण आजारपण सुरू झाले की त्यावर अनेक बंधने येतात, हेच आजारपण जास्त काळ चालले की मग आपल्याला हवी असलेली जीवनपद्धती आणि आजारपणामुळे बदललेली जीवनपद्धती यांमधील तफावत आपल्याला निराश करते, आपण आजारपणासाठी स्वतःला दोष देतो/  स्वतःला critisize करतो. ही toxic critisism आपल्यासाठी फार धोकादायक ठरते. यामुळे आपली सेल्फ esteem खराब होऊन आत्महत्येचे विचार मनात येऊ लागतात.

यासाठी आपण काय करू शकतो ?

Chronic illness वर मात करताना किंवा त्यासोबत जगताना आपण होणारे त्रास कमी करण्यासाठी आपली विचार पद्धती बदलू शकतो, अनेकदा आपले विचार आणि वास्तव यास्त खूप फरक असतो. उदा. आपल्याला वाटते की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो पण वास्तविक सूर्य एकच ठिकाणी स्थिर असून पृथ्वीचं स्वतः भोवती फिरत असते  म्हणून आपल्याला असा भास होतो. त्यामुळे आपण देखील भासांवरून आपल्या परिवाराला judge करू नये.  उलट त्यांच्या सपोर्ट ने परिस्थिती सुखकर बनवायला मदत करावी.

आपण कोणत्याही मोठ्या आजारपणात असलो तरीही सच्चे मित्र कमवा आणि त्यांना आपल्या मनातील सर्व भावना सांगा. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते म्हणून सर्वांना सारखाच मार्ग सांगता येणार नाही, पण आपल्या मनात असे काही विचार येत असतील तर संकोच न करता नक्कीच संपर्क करा.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.