fbpx

कामाच्या ठिकाणी भावनांचा उद्रेक कसा टाळावा ?

ऑफिस मध्ये तुम्ही तुमच्या कामाचे प्रेझेंटेशन दिले पण बॉस कडून अनपेक्षित negative फीडबॅक आला की अचानक तुमचे डोळे भरून येतात/ किंवा राग येतो. अशा वेळी त्या तीव्र भावना कशा व्यक्त करायच्या हे आपल्याला कळत नाही आपण अचानक मीटिंग / काम सोडून वॉक साठी जाऊ शकत नाही, तिथे ध्यान करू शकत नाही किंवा डायरी लिहून मन मोकळे करू शकत नाही. मग अश्या वेळी नेमके काय करावे ?

हल्लीच्या वर्क कल्चर मध्ये High achievers चे प्रमाण खूप वाढत आहे, आपण स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो पण त्या पूर्ण न झाल्यास स्वतःवर रागावतो. कधी कधी आपल्या टीम मधील एखाद्या व्यक्तीने नेमलेले काम पूर्ण न केल्यास, आपल्याला कामाची योग्य पावती (क्रेडिट) न मिळाल्यास, आपण योग्य असून पगारवाढ / बढती न मिळाल्यास आपल्या भावना तीव्र रूप घेतात.

कामाच्या ठिकाणी राग, दुःख या भावना कॉमन आहेत पण त्याचसोबत निराशा, panic होणे, लज्जा ( shame / embarrassment) या जटील भावना देखील हल्ली मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळतात. या भावनांना योग्य प्रकारे न हातळल्यास आपण ओव्हर रिॲक्ट करून परिस्थिती अजून खराब होऊ शकते.

स्ट्रेस किंवा भावना हाताळण्याचा अनेक पद्धती ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी करणे खूपच कठीण किंवा हास्यास्पद असते. उदाहरण द्यायचे झाले तर मुन्नाभाई MBBS चित्रपटात बोमन इराणी यांनी साकारलेली Dr. जे. अस्थाना हे आपला राग शांत करायला खूप राग आल्यावर हसताना दाखवले आहेत. जर आपण असे कामाच्या ठिकाणी केले तर आपल्यावर हसणारे लोक जास्त असतील. त्यामुळे या पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून सोपे आणि तितकेच परिणामकारक उपाय शोधणे गरजेचे झाले होते.

खूप विचार आणि प्रयोग करून तीव्र भावना नियंत्रित करण्यासाठीचे सोपे मार्ग आपल्या सोबत शेअर करतो.

✳️ Take a chill pill – cool down

जेव्हा आपण कोणतीही भावना अनुभवतो तेव्हा शरीर एकतर त्याच्याशी सामना करायचा किंवा तिथून काढता पाय घेण्याचा निर्णय घेते. आपली sympathetic nervous system जागृत होते, हृदयाचे ठोके वाढतात, शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे भीती किंवा राग आला की अनेकदा तळ हाताला घाम येतो, आणि शरम किंवा लाज वाटली ( embarrassment) की चेहरा उतरतो.

त्यामुळे या भावनांना आवर घालायला शरीराचे तापमान कमी करणे हा एक महत्वाचा मार्ग आहे, थंड / मठातील गार पाणी पिणे, ज्यूस घेणे किंवा पंख्याखाली / ac वेंट समोर बसणे , तोंडावर पाणी मारणे हे पर्याय आपण कामाच्या ठिकाणी सहज करू शकतो.

वरकरणी हे प्रकार बालिश वाटत असतील, परंतु या पाठी वैज्ञानिक कारण आहे, या सर्व क्रियानी mammalian diving reflex क्रिया होते आणि parasympathetic nervous system जागृत होते, त्यामुळे आपण रिलॅक्स होतो.

✳️ श्वसन

Covid च्या वेळी एक श्वसनाची पद्धत सर्वश्रुत झाली. बॉक्स ब्रिथिंग असे त्या पद्धतीचे नाव. भावनांचा उद्रेक होत आहे असे वाटत असेल तर या पद्धतीने श्वसन केल्यास anxiety कमी होते. Navy seal नामक प्राणी या पद्धतीने श्वसन करतो त्यामुळे तो सतत अलर्ट असूनही focused आणि calm असतो.

4 सेकंद श्वास घ्या.
मग श्वास 4 सेकांदासाठी रोखून धरा.
4 सेकंद श्वास सोडा पूर्ण फुफुसे रिकामी करा.
मग 4 सेकंद श्वास घेऊ नका.

यासाठी काही विडिओ गाईड देखील गूगल वर उपलध आहेत.

✳️ Grounding

भावना तीव्र झाल्या की त्या भावनांशी निगडित जुने अनुभव आपल्याला आठवतात आणि आपण त्या अनुभवातून भविष्याचा अवाजवी विचार करतो. हे नकारात्मक विचार विसरून आपण वर्तमान काळात आपले लक्ष केंद्रित करू शकतो.

जेव्हा भावना तीव्र होतील तेव्हा हाताच्या मुठी घट्ट करा आणि मग मोकळे सोडा, पायाने जमीन खोदल्यासारखे करा, खुर्ची वर वजन शिफ्ट करा, बोलणाऱ्या व्यक्तीचे कपडे किंवा भिंतीचा रंग, अश्या अस्तित्वात असलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही Reality आणि वर्तमानात राहाल, भरकटत जाणार नाही.

✳️ वेळ घ्या

आपण कधी कधी पटकन बोलून जातो आणि मग आपल्याला खूप पश्चाताप होतो, पण तोवर वेळ निघून गेलेली असते. आपले स्वतःवरील नियंत्रण कसे वाढवावे ? अनेकदा आपल्याला कामात आपल्या परफॉर्मन्स विषयी अनेक प्रश्न येतात किंवा समोरचा व्यक्ती नेमका कोणत्या दृष्टिकोनातून बोलत आहे हे कळत नाही अशावेळी त्या व्यक्तीला प्रश्न विचारा.

उदा. जसे माझ्याकडुन काय अपेक्षा होत्या ? मी हे काम कसे केले असते तर बरे झाले असते ? या प्रश्नाची उत्तरे येई पर्यंत आपल्याला देखील विचार करायला वेळ मिळतो. आपले विचार शांत करता येतात, भावनांवर नियंत्रण मिळवता येते आणि कसे उत्तर द्यायचे हे ठरवता येते.

आपल्या भावनांशी लढणे व्यर्थ असते, त्यामुळे फक्त मनस्ताप मिळतो, त्या ऐवजी त्यांचा स्वीकार करा आणि योग्य प्रकारे त्यांना नियंत्रित आणि manage करा.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.