fbpx

House of secrets ही डॉक्युमेंट्री पहिली आणि खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला विषय सर्वांसमोर मांडायचा निश्चय केला. Delusions किंवा भ्रम हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही, “नसत्या भ्रमात राहू नकोस !” असे उद्गार तुम्ही सर्वांनी ऐकले असतीलच. आजच्या लेखात आपण Delusional disorder हा दुर्मिळ पण महत्वाच्या डिसऑर्डर विषयी सविस्तर माहिती घेऊ.

Delusion किंवा भ्रम म्हणजे कधीही न बदलणारा विचार, कुणी तो विचार चुकीचा आहे असे पुराव्याने जरी सिद्ध केले तरीही ते नाकारणे. उदा. काही व्यक्तींना भ्रम होतो की त्यांची किडनी डॉक्टर ने काढून कुणालातरी विकली आहे, अगदी त्यांच्या शरीरावर ऑपरेशन चे कोणतेही मार्क नसले तरीही ते आपल्या विचारणार ठाम असतात.

एखादी व्यक्ती जेव्हा एक वर्ष किंवा अधिक काळापासून एक किंवा अधिक भ्रम/ delusion घेऊन वावरत असेल तर त्याला आपण Delusional disorder म्हणू शकतो. schizophrenia आणि Delusional disorder यांमध्ये फरक आहे, Delusional disorder मुळे व्यक्तीच्या रोजच्या जीवनात जास्त फरक पडत नाही, किंवा त्यांचे वागणे सर्वांनाच वेगळे वाटत नाही. जेव्हा त्यांच्या delusion समंधित कोणताही विषय छेडला जातो तेव्हा ते ट्रिगर होतात आणि त्यांचे भ्रम सर्वांसमोर मांडतात.

Delusional disorder चे काही मुख्य प्रकार.

✳️ Erotomanic – या प्रकारात मोडणारे लोक स्वतःला उच्च दर्जाचे समजत असतात. त्यांची सेल्फ इमेज आणि सेल्फ लव्ह हे परिस्थिती पेक्षा जास्त मोठे असतात.

✳️ Grandiose – या प्रकारात व्यक्तीला वाटत असते की त्यांच्याकडे कोणतेतरी लपलेले टॅलेंट आहे, त्यांच्या सेल्फ वर्थ, knowledge, power, relationship याबद्दल यांना गर्व असतो. त्यांना सतत वाटते की ते मोठ्या व्यक्तीसोबत किंवा देवाशी संपर्कात आहेत आणि त्यांना हे लोक संदेश देत आहेत.

✳️ Jealous – या प्रकारात व्यक्तींना सतत मत्सर वाटत असतो, आपला पार्टनर हा आपल्याला फसवत आहे अशी यांची समजूत असते.

✳️ Persecutory – या प्रकारात लोकांना त्यांना कुणीतरी फसवत आहे, गुंगीचे औषध देत आहे, पाठलाग करत आहे असे भ्रम होत असतात.

✳️ Somatic – या प्रकारात लोकांना सतत असे वाटत असते की त्यांची तब्येत ठीक नाहिये, शरीरात त्वचेखाली काही किडे फिरत आहेत किंवा दुर्गंध येत आहे, हाड तुटले आहे असे वाटते.

✳️ Mixed – वरील पैकी कोणत्याही 2 किंवा अधिक प्रकारचे भ्रम व्यक्तीला या प्रकारात जाणवतात.

✳️ Unspecified – काही भ्रमांचे वर्गीकरण केलेले नसते किंवा ते वरील प्रकारात मोडत नाहीत, अश्यांना या गटात समाविष्ट केले जाते.

Persecutory हा प्रकार सर्वात जास्त आढळणारा असून 0.2 टक्के लोक आयुष्यात कधीतरी त्याचा अनुभव घेतात. Delusional disorder चा शिकार स्त्री आणि पुरुष दोघेही होऊ शकतात आणि कोणत्याही वयात हा डिसऑर्डर डोके वर काढू शकतो.

Delusional disorder ची लक्षणे

एक किंवा जास्त delusion जेव्हा एक वर्ष किंवा अधिक काळासाठी असते तेव्हाच त्याला Delusional disorder म्हणून ग्राह्य धरले जाते. काही delusion हे विक्षिप्त असतात, त्यांचा स्वीकार करणे समाजाला कठीण जाते, उदा. मृत व्यक्तीचे आवाज ऐकू येणे आणि ते आपल्याला काहीतरी संदेश देत आहेत असा समज करून घेणे. ते काही delusion हे सामान्य असतात जसे कुणीतरी आपले कॉल रेकॉर्ड करीत आहेत इत्यादी.

Delusional disorder असणारे लोक सामान्य आयुष्य जगत असल्याने त्यांना ओळखणे कठीण जाते. एखाद्या व्यक्तीला खरच Delusional disorder आहे की नाही याचे निदान करायचे असेल तर ट्रिगर करणारी परिस्थिती पुन्हा आठवून द्यावी लागते. उदा. त्यांच्यासमोर ऑपरेशन किंवा मेडिकल कंडीशन बद्दल बोलणे.

राग आणि हिंसक व्यवहार ही लक्षणे सामान्यपणे persecutory, jealous, किंवा erotomanic delusions मध्ये आढळतात. कोणताही व्यक्ती आपण भ्रमात आहोत हे स्वीकारत नाही, त्यामुळे त्याच्या प्रिय व्यक्ती कडून किंवा अन्य मार्गांनी ते शोधावे लागते.

Delusional disorder पाठील कारणे –

ही एक दुर्मिळ परिस्थिती आहे, त्यामुळे यावर पुरेसे संशोधन झाले नाही. उपलब्ध माहिती नुसार आपल्या आत्यंतिक स्ट्रेस आणि ट्रॉमा विसरण्यासाठी प्रयत्न करणारे लोक हे delusion चा शिकार होतात. जनुकीय संरचना देखील यासाठी कारणीभूत असते. जर परिवारात कुणी schizophrenia किंवा schizotypal personality disorder यांचा शिकार असेल तर व्यक्तीला Delusional disorder होण्याचे चान्स जास्त असतात.

Delusional disorder साठी उपलब्ध उपचार –

Delusional disorder वर उपचार करणे कठीण असते, कारण रुग्ण त्यांचे भ्रम हे त्रासदायक आहेत हे स्वीकारायला तयार नसतात. त्यात अनेकदा थेरपिस्ट सोबत विश्वासाचे नाते निर्माण करताना त्यांना अनेक समस्या येतात.

यांचे निदान करताना देखील खूप लक्षपूर्वक करावे लागते कारण delusion अन्य मानसिक आजारात देखील होऊ शकतात. एखाद्या व्यक्ती मध्ये शारीरिक आजार आणि व्यसनामुळे देखील delusion निर्माण होऊ लागतात. त्यामुळे योग्य असेसमेंट करणे गरजेचे असते. .

Delusional disorder साठी औषधे आणि talk थेरपी दोन्ही घ्यावी लागते, आजार किती जुना आहे आणि त्याचे किती अपायकारक आहे यावरून उपचार कालावधी ठरतो. यात व्यक्ती स्वतःला इजा देखील पोहचवू शकतो त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. Support थेरपी, cognitive थेरपी, anti depressent औषधे असे अनेक मार्ग वापरून व्यक्तीवर इलाज करता येतो.

जेव्हा भ्रम असणारी व्यक्ती समाजात वावरते तेव्हा तिला लोक खूप criticize करतात त्याची निंदा करतात, दोष देतात त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था अजून बिघडते. या आजारातून बाहेर पडण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे समाजात जागृती निर्माण करणे. आणि व्यक्ती वेडी नसून आजारी आहे आणि ट्रीटमेंट ने ती ठीक होऊ शकते हे मनाशी पक्के करणे.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.