fbpx
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय ?
आपल्या भावनांची समज, त्यांचे नियंत्रण आणि मूल्यमापन म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स.
काही रिसर्च अनुसार इमोशनल इंटेलिजन्स जन्मजात कौशल्य आहे तर काहींच्या मते तो प्रयत्नांनी वाढवता येतो.
आपल्या भावना एक्सप्रेस करणे आणि नियंत्रित करणे ही क्षमता खूप गरजेची आहे, तसेच दुसऱ्याच्या भावना समजून घेणे, त्यांचा योग्य अर्थ लावणे, आणि योग्य प्रकारे रेस्पोंड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याचा अबिलिटी ला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. काही तज्ञांच्या मते आयक्यू पेक्षा इमोशनल इंटेलिजन्स जास्त महत्त्वाचा आहे.

इमोशनल इंटेलिजन्स कसा मोजतात ?
इमोशनल इंटेलिजन्स मोजण्यासाठी बऱ्याच चाचण्या उपलब्ध आहेत, साधारणपणे या दोन मुख्य प्रकार आहेत.
 • सेल्फ रिपोर्ट टेस्ट
 • Ability टेस्ट

सेल्फ रिपोर्ट टेस्ट ही सर्वात कॉमन पद्धत आहे, आपल्यासमोर काही प्रश्न असतात त्यांची उत्तरे आपण आपल्या वागणुकी नुसार हो / नाही किंवा रेटिंग scale वर द्यायची असतात. उदा. मी दुसऱ्यांना दुःखात पाहून स्वतः पण दुःखी होतो. पर्याय असू शकतात – अजिबात नाही, कधी कधी, नेहमी. स्वतःशी प्रामाणिक राहून ही टेस्ट दिल्यास रिझल्ट accurate येतात.

Ability टेस्ट – एका विशिष्ठ परिस्थिती मध्ये आपण कसे रेस्पोंड करतो यावरून असेसमेंट केली जाते, अशा टेस्ट साधारणपणे आपल्या abilities दाखवण्यासाठी असतात, यात आपल्या third पार्टी मार्क्स देते.

जर तुम्ही अशी टेस्ट देत असाल तर दोन असेसमेंट method प्रसिद्ध आहेत.
 • Mayer-Salovey-Caruso Emotional Intelligence Test (MSCEIT)- या प्रकारात समोरच्याची ability टेस्ट करण्यासाठी पुढील निकष (कंडीशन) ठेऊन टास्क तयार केलेले असतात : भावनांचे आकलन, त्यांची ओळख, समज आणि सुयोग्य management.
 • Emotional and Social Competence Inventory (ESCI) – हे सेल्फ असेसमेंट tool आहे ज्यात प्रश्नसंच (questionnaire) असून आपल्या समजुती प्रमाणे त्याची उत्तरे द्यायची असतात. या टेस्ट म्हणून सामाजिक आणि भावनिक कौशल्ये कळतात.

आपला इमोशनल इंटेलिजन्स तपासायला इंटरनेट वर अनेक फ्री टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत.

मुख्य घटक:
संशोधकांच्या मते इमोशनल इंटेलिजन्स च्या चार मुख्य पायऱ्या आहेत.
 • भावनांचे आकलन – भावना समजून घेण्याआधी भावनांचे योग्य आकलन खूप गरजेचे आहे, बरेचदा यामध्ये चेहऱ्यावरील हावभाव, शरीराच्या हालचाली हे घटक महत्त्वाचे ठरतात.
 • भावनांचा तर्कशुद्ध विचार – आपल्या भावनांचा तर्कशुद्ध विचार करून संज्ञानात्मक गोष्टींसाठी त्यांचा वापर करणे. आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आणि कसे react करायचे हे भावना ठरवतात त्यामुळे तार्किक विचार महत्त्वाचा ठरतो.
 • भावना समजून घेणे – आपण ज्या भावनांचे आकलन करतो त्यांचे वेगवेगळे अर्थ असू शकतात,म्हणजेच एखादा रागावलेला असताना त्याच्या रागाचे कारण शोधून काढणे त्याचा अर्थ समजून घेणे. समजा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे सीनियर तुमच्यावर खूप रागावले असतील तर प्रत्येक वेळी गरजेचे नाही येते तुमच्या परफॉर्मन्स वर नाराज आहेत, कदाचित आज घरी त्यांचे बायकोची भांडणे झाली असू शकते त्यामुळे नाराज असू शकतात.
 • भावनांचे योग्य मॅनेजमेंट – आपल्या भावनांचे योग्य मॅनेजमेंट करणे ही इमोशनल इंटेलिजन्स ची सर्वात वरची पायरी आहे, आपल्या भावनांचे योग्य नियोजन आणि योग्य प्रकारे रेस्पोंड करणे तसेच दुसर्‍यांच्या भावनांची योग्य कदर करणे हा इमोशनल इंटेलिजन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

या मुख्य चार घटकांचा क्रम हा त्यांचा जटिलतेनुसार लावण्यात आला आहे, बेसिक प्रोसेस आधी आणि नंतरच्या घटकांमध्ये advance प्रोसेस आहेत, बेसिक मध्ये भावनांचे आकलन आणि प्रकटीकरण (expression) आहे तर advance मध्ये त्यांचे नियोजन आणि नियंत्रण असे जटिल विषय आहेत.

इमोशनल इंटेलिजन्स चा प्रभाव आणि परिणाम :
गेल्या दशकात इमोशनल आणि सोशल इंटेलिजन्स चा अंतर्भाव शालेय शिक्षण करण्यात आला आहे, मानसिक स्वास्थ्यासाठी आणि bullying थांबण्यासाठी याचा वापर होत आहे. दैनंदिन आयुष्यात इमोशनल इंटेलिजन्स आपल्याला अनेक प्रकारे मदत करतो.

 • प्रतिक्रिया देण्याआधी विचार करणे – इमोशनल इंटेलिजन्स जास्त असणाऱ्या व्यक्तींना माहीत असते की भावना जास्त महत्त्वाच्या असल्या तरी त्या टेम्पररी आहेत, उदाहरणार्थ असे व्यक्ती कामाच्या ठिकाणी एखाद्या वर्कर वरती चिडले तर प्रतिक्रिया द्यायच्या आधी भावनांना आवर घालून शांत डोक्याने विचार करतील त्यामुळे होणारे गैरसमज आपोआप टळतील.
 • Self awareness – इमोशनल इंटेलिजन्स चांगला असणाऱ्या व्यक्ती फक्त समोरच्याच्या नाही तर स्वतःच्या भावनांना सुद्धा योग्य प्रकारे समजून घेऊन मॅनेज करतात त्यामुळे सेल्फ अवेअरनेस लेव्हल चांगली असते.
 • सहानुभूतीची भावना – दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करणे आणि त्यांना सहानुभूती देणे हा इमोशनल इंटेलिजन्स चा एक महत्त्वाचा भाग आहे, समोरच्याच्या परिस्थितीमध्ये स्वतःला इमॅजिन करून आपण कसे रेस्पोंड केले असते किंवा आपल्याला कसे वाटले असते हा विचार पण इमोशनल इंटेलिजन्स स्ट्रॉंग असण्याचे लक्षण आहे.

इमोशनल इंटेलिजन्स चा वापर कसा करावा:
 • Criticism आणि responsibility स्वीकारणे.
 • चूक केल्यानंतर सहज move on होणे.
 • नाही म्हणण्याची कला अवगत असणे.
 • आपल्या भावना शेअर करण्याची कला अवगत असणे.
 • सहानुभूतीची भावना असणे.
 • ऐकून घेण्याची क्षमता असणे.
 • कोणतीही गोष्ट आपण का करत आहोत ही जाणीव असणे.
 • दुसऱ्याची परिस्थिती माहीत नसताना त्याला Judge न करणे.
 • आपले प्रॉब्लेम solve करताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे सोल्युशन शोधणे.

इमोशनल इंटेलिजन्स मुळे आपले इंटरपर्सनल कम्युनिकेशन सुधारते, एक सुखी आयुष्य जगण्यासाठी IQ सोबत इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्त्वाचा आहे. इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी असे काही पर्याय सुदैवाने उपलब्ध आहेत.

इमोशनल इंटेलिजन्स कसा वाढवावा ?

 • ऐकून घेणे – समोरचा काय विचार करतोय हे जाणून घेण्यासाठी त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे खूप महत्त्वाचे असते त्याच बरोबर फक्त शब्दांकडे लक्ष देता त्याच्या बॉडी लैंग्वेज कडे, त्याच्या हालचालींकडे, चेहऱ्यावरील भावनांकडे म्हणजे फेशिअल एक्सप्रेशन कडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. शब्दांच्या पलीकडे जाऊन समोरची व्यक्ती असे का बोलत आहे याची अन्य कारणे शोधणे असे मार्ग अवलंबून आपला इंटेलिजन्स वाढवू शकतो.
 • सहानुभूतीची भावना ठेवणे – समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे खूप जास्त गरजेचे आहे, समोरच्या व्यक्तीने एखादी गोष्ट केल्यानंतर किंवा एखादी भावना व्यक्त केल्यानंतर त्याचा दृष्टीकोन समजून घेणे, आपण त्या परिस्थितीत असतो तर कसे वागलो असतो किंवा काय विचार केला असता या गोष्टी कन्सिडर करणे सुरू केले की आपली इमोशनल ग्रोथ सुरू होते.
 • भावनांचे प्रतिबिंब – तुमच्या भावना तुमच्या निर्णयावर कसा प्रभाव पाडतात ते समजून घ्या त्याच प्रकारे समोरची व्यक्ती जेव्हा काही वागते तेव्हा त्याच्या पाठी असणाऱ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. उदा. असे काही झाले की पुढील प्रश्न स्वतःला विचारावे – समोरचा व्यक्ती असं का वागत असेल ? या पाठी कोणते घटक असतील जे आपल्याला दिसत नाहीयेत? आपल्या भावना यांच्यापेक्षा वेगळ्या कशा आहेत ? असे शोधणे सुरू केले की मग आपल्याला कळते की आपले वागणे हे भावनांचे प्रतिबिंब असते.

ज्यांचा इमोशनल इंटेलिजन्स कमी असतो अशा लोकांना रिलेशनशिप किंवा कोणत्याही प्रकारची नाती सांभाळताना खूप त्रास होतो, सतत आर्ग्युमेंट करणे, इमोशनल प्रॉब्लेम्स आले की डाउन वाटणे किंवा त्यांच्याशी कोप करू न शकणे, आत्महत्येचे विचार येणे असे अनेक व्यक्तिमत्त्वाशी रिलेटेड प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात.

त्याच प्रकारे हाय इमोशनल इंटेलिजन्स असणाऱ्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात.
 • काही तज्ञांच्या मते यांचा इमोशनल इंटेलिजन्स आहे असतो अशी लोकं क्रिएटिव्ह कामांमध्ये थोडेसे कमजोर असतात.
 • इमोशनल इंटेलिजन्स स्ट्रॉंग असणाऱ्या लोकांना इतरांना दुखावण्याचा भीतीने स्वतःच्या भावना कधी कधी मानता येत नाही, एखाद्या व्यक्तीबद्दल निगेटिव फीडबॅक ही त्यांना पटकन देता येत नाही.
 • हाय इमोशनल इंटेलिजन्स असणारे व्यक्ती कधी कधी manipulative होतात तर कधी इतरांना संभ्रमात टाकतात. ( असे होण्याचे चान्सेस हाय self-esteem असणार्‍यांमध्ये असतात)

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.