fbpx
images.jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

जिम मध्ये छान वर्कआऊट केल्यानंतर किंवा मस्त ट्रेकिंग केल्यानंतर, मॉर्निंग वॉक नंतर आपल्याला एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. तो आनंद आपल्या शरीरातील इंडॉर्फिन नामक न्युरो केमिकल्स मुळे अनुभवता येतो. Dopamine आणि Serotonin यांच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर आपण आज इंडॉर्फिन बद्दल जाणून घेऊ.

Endorphin ह्या शब्दाचा उगम हा “Endogenous” म्हणजे शरीरात असणारे आणि “Morphin ” एक अफिम वर्गातील वेदना निवारक ( pain reliever) यांच्या संधी ने झाला आहे. थोडक्यात Endorphins हे नैसर्गिक वेदना निवारक आहेत.

Endorphins म्हणजे peptide समूह, peptide ही Amino Acid ची साखळी असते. आपल्या शरीरात Endorphins हे सेंट्रल नर्व्हस सिस्टीम ( CNS) आणि pitutary gland मार्फत तयार होतात. Endorphins हे आपल्या मेंदूतील अफिम receptors वर काम करतात, त्यामुळे वेदना कमी होतात आणि आपल्याला आनंद ( pleasure) अनुभवायला मिळतो. Endorphins हे स्ट्रेस किंवा pain असताना तयार होतात त्यामुळे आपल्याला तात्पुरते चांगले वाटते तसेच व्यायाम केल्यानंतर, शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर, जेवणानंतर सुद्धा Endorphins उत्पन्न होते.

Endorphins चा उद्देश –

अजूनही आपल्याला Endorphins चे पूर्ण कार्य किंवा उद्देश समजले नाहीत पण शरीरातील वेदना कमी करणे आणि आपल्याला आनंदाची अनुभूती म्हणजेच pleasure फील करवणे हा त्यांच्या प्राथमिक उद्देश आहे.

Endorphins आपल्या नैसर्गिक reward सिस्टीम चा एक भाग आहेत, त्यांचा संबंध शरीरासाठी महत्वाच्या असलेल्या ॲक्टिविटी जसे खाणे पिणे, शारीरिक स्वास्थ्य, व्यायाम, संभोग यांच्याची आहे. प्रसूतीच्या काळात (pregnancy) मध्ये सुध्दा Endorphins वेदना कमी करून आनंद देण्याचे काम करते. अनेक आघात होऊन सुद्धा सगळे सहन करण्याची शक्ती यांच्याकडूनच मिळते.

मानवी स्वभावच आहे की आपल्याला आनंदाची अनुभूती हवी असते आणि वेदना दूर राहाव्यात अशी आपली इच्छा असते. ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो ते पुन्हा पुन्हा करायची आपल्याला इच्छा होते. Endorphins कुठेतरी आपल्या वेदनांना शांत करून आनंद देते म्हणून sweet pain – ट्रेकिंग करणे, जिम मध्ये व्यायाम करणे, वॉक करणे, संभोग अशा कृती आपण पुन्हा पुन्हा करतो.

Endorphins चे फायदे –

 • डिप्रेशन कमी करणे – जगात 20% लोक आयुष्यात कधीतरी डिप्रेशन चा शिकार होतात, माझ्या लेखनात सुद्धा डिप्रेशन साठी व्यायाम करणे हा सल्ला मी अनेकदा देतो, व्यायामामुळे Endorphins निर्माण होतात आणि आपल्याला आनंद मिळतो. नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते.

• Stress and anxiety कमी करणे – Endorphins ची मात्रा आणि चिंता ( anxious) पूर्ण वागणूक यात जवळचा संबंध आहे. ( उंदरावर केलेला प्रयोग). त्यामुळे Endorphins ची योग्य पातळी स्ट्रेस कमी करण्यात मदत करू शकते.

 • सेल्फ ईस्टीम – सकारात्मक विचार आपल्याला आत्मविश्वास देतात, एका रिसर्च नुसार Endorphins ची योग्य मात्रा सकारात्मक विचारांना चालना देते, त्यामुळे सेल्फ इस्टीम वाढीस लागते.

• वजन नियंत्रित करणे – आपली भूक नियंत्रण करण्यात Endorphins सोबत अनेक हार्मोन काम करत असतात, पण परिपूर्ण आहार घेतल्याने Endorphins ची लेव्हल वाढते त्यामुळे भूक नियंत्रणात येते असे सिद्ध झाले आहे. ही लेव्हल योग्य राहिल्याने आपण junk food खाणे टाळतो आणि वजन नियंत्रित राहते.

• प्रसूती मध्ये वेदना कमी करते – आई होणे हे जगातील सर्वात मोठे सुख समजले जाते पण बाळाला जन्म देताना आई ला प्रचंड वेदना होत असतात, Endorphins या वेळी वेदना कमी करायचे काम करतात. 45 स्त्रितांसोबत केलेल्या प्रयोगात असे निदर्शनास आले की ज्यांची Endorphins पातळी कमी होती त्यांना प्रसूती दरम्यान pain reliever dose जास्त प्रमाणात द्यावे लागले.

Endorphins ची कमतरता कशी ओळखावी ?
Endorphins बद्दल अजूनही स्टडी सुरू असल्याने याची कमतरता जाणून घेण्याचे काही निश्चित मापदंड नाहीत, पण शरीरात Endorphins ची कमतरता असेल तर पुढील त्रास जाणवू शकतात.
 • डिप्रेशन
 • मूड स्विंग
 • अंगदुखी ( थोडे चाललो की थकवा)
 • व्यसनाधीनता
 • झोप न येणे

नैसर्गिकरीत्या Endorphins वाढवण्याच्या पद्धती

प्रत्येकवेळी Endorphins निर्मिती साठी जिम मध्ये खूप कसरत करणे किंवा ट्रेकिंग ला जाणे आवश्यक नाही, खाली दिलेले सोपे मार्ग वापरून सुद्घा तुम्ही Endorphins ची निर्मिती होण्यास पोषक वातावरण निर्माण करू शकता.
 • डार्क चॉकलेट खाणे.
 • व्यायाम (ग्रुप मध्ये करणे जास्त फायद्याचे ठरते)
 • संभोग ( पार्टनर consent आवश्यक)
 • गाणी ऐकणे किंवा गाणे.
 • मनमोकळे हसणे.
 • ॲक्कुप्रेशर आणि मसाज.
 • तुमची आवडती डिश खाणे.
 • थोडे मसालेदार अन्न सेवन.
 • सुगंधी द्रव्य किंवा अत्तर यांचा वापर.
 • ध्यान.
 • आवडता चित्रपट बघणे.
 • मित्रांसोबत गप्पा मारणे.
तुम्ही कोणत्याही वेदनेत/ दुःखात असाल तरीही वरील मार्ग नैसर्गिकरीत्या तुमची Endorphins पातळी वाढवून तुम्हाला चांगले फील करवतात. मासिक पाळी मध्ये देखील वरील मार्ग दुःख कमी करतात.

Dopamine आणि Endorphins मधील फरक.
Endorphins हे peptide असतात आणि ते सेंट्रल नर्व्हस सिस्टीम द्वारे तयार होतात त्यांचे काम स्ट्रेस आणि वेदना कमी करणे असते. Endorphins मुळे जे pleasure मिळते ते Dopamine ची निर्मिती झाल्यामुळेच मिळते. सोप्या भाषेत सांगायचे तर Endorphins मुळे Dopamine ची निर्मिती सुरू होते कारण हे दोन्ही reward सिस्टिमचा भाग आहेत.

Dopamine विषयी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.