fbpx

आपले Strengths कसे शोधावे ?

प्रत्येक व्यक्ती युनिक असते असे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा माझ्यात काय युनिक आहे हा प्रश्न आपल्या मनात येतोच. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या strength युनिक बनवत असतात, व्यक्तीची strength ही त्याचे व्यक्तिमत्त्व, स्किल आणि टॅलेंट यांवरून ठरत असते. आपल्या strength शोधण्याचे काही मार्ग आणि त्यांचे महत्त्व आजच्या लेखातून जाणून घेऊ.

जेव्हा आपल्याला आपल्या strengths कळतात तेव्हा आपण कसे युनिक आहोत हे समजणे सोपे जाते. आपल्या strengths शोधण्याची पहिली पायरी म्हणजे पुढील प्रश्न स्वतःला विचारणे.

✳️ तुमचे शिक्षण किती आहे ?
✳️ तुम्हाला किती भाषा येतात ?
✳️ तुम्ही शिक्षणेतर कोणते कोर्स केले आहेत का ?
✳️ तुमचे मुख्य स्किल्स कोणते ?
✳️ तुम्हाला कोणती कामे चांगल्या प्रकारे येतात ?
✳️ कोणत्या कलेत तुम्ही पारंगत आहात ?
✳️ तुमच्या व्यक्तिमत्त्वातील तुमचे आवडते मुद्दे कोणते ?

Self analysis quiz –

स्वतःचे परीक्षण करण्यासाठी पुढील प्रश्नाची प्रामाणिक उत्तरे द्या. गुणांनुसार strength ठरवा. 1 ते 10 या प्रमाणात मार्क द्या.

✳️ Leadership – मी चार्ज घेऊन काम करतो  लोकांचे नेतृत्व उत्तमरीत्या करतो.
✳️ Calmness – मी प्रत्येक परिस्थिती मध्ये शांत असतो.
✳️ Playfulness – मी सगळ्या गोष्टी रमत गमत करतो.
✳️ Persistence – मी काम पूर्ण झाले की मगच निवांत बसतो, कोणतेच काम अर्धवट सोडत नाही.
✳️ Social Skills – मी नवीन मित्र सहज बनवतो.
✳️ Competence – मी आलेल्या अडचणींना योग्य पर्याय शोधतो.

आपल्या strength माहीत असणे का आवश्यक आहे ?

वरील प्रश्न हे आम्ही व्यक्तिमत्व चाचणीमध्ये विचारतो.

❤️ आपले strengths आणि weakness शोधताना आपल्याला स्वतःबद्दल नवीन गोष्टी कळतात आणि Self awareness वाढीस लागते.

❤️ आपल्या strengths आपल्याला समजल्या की आपण स्वतःबद्दल सकारात्मक विचार सुरू करतो.

❤️ जेव्हा आपल्याला आपल्या strengths कळतात तेव्हा आपण त्या रोजच्या आयुष्यात वापरू लागतो त्यामुळे आपल्याला आनंद मिळू लागतो.

❤️ जेव्हा आपल्याला आपल्या strengths माहीत होतात तेव्हा आपली productivity वाढीस लागते, काम करताना आपली एनर्जी आणि उत्साह देखील चांगला असतो.

❤️ आपल्या strength माहीत झाल्या की आपला आत्मविश्वास वाढतो आणि anxiety कमी होते.

प्रश्न उत्तरे कठीण वाटत असतील तर त्या सोबत पुढील पर्याय देखील आपली मदत करू शकतात.

✳️ आपले जवळचे मित्र आहेत त्यांच्याशी बोला त्यांना विचारा की त्यांच्या नजरेत तुमचे strengths कोणते आहेत ? त्यांना योग्य प्रकारे फीडबॅक द्या.

✳️ तुमच्या आयुष्यात तुम्हाला जेव्हा यश प्राप्त झाले ते अनुभव आठवा आणि कोणत्या strengths मुळे ते यश आपल्याला मिळाले त्याचा विचार करा आणि ते मुद्दे note करा.

✳️ प्रत्येक व्यक्ती मध्ये 9 प्रकारचे इंटेलिजन्स असतात, त्यानुसार स्वतःची परीक्षा घ्या.

1️⃣ Linguistic – भाषेवरील प्रभुत्व
2️⃣ Logical – तर्कशास्त्र
3️⃣ Visual – Imagination
4️⃣ Kinesthetic – शारीरिक कौशल्ये आणि क्षमता
5️⃣ Intrapersonal – स्वतःला समजून घेण्याची क्षमता
6️⃣ Interpersonal – लोकांना समजून घेण्याची क्षमता
7️⃣ Naturalistic – निसर्गाची आवड
8️⃣ Musical – संगीत आणि rhythm चे ज्ञान
9️⃣ Existential – आपले अस्तित्व का आहे याचा बोध

यासाठी प्रश्नोत्तरे आणि DMIT टेस्ट असे पर्याय उपलब्ध आहेत.

आपण जसे जसे नवीन गोष्टी शिकतो तसे तसे आपल्या strengths वाढत जातात, त्यामुळे आत्मपरीक्षण सुरू ठेवा. त्याचसोबत तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडतील अशा strengths वाढवायचा प्रयत्न करा.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.