fbpx

Rejection चा सामना कसा करावा ?

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

दैनंदिन आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी Rejection ला सामोरे जात असतो, आपण इंटरव्ह्यू दिलेला जॉब आपल्याला न मिळणे, एखाद्या मित्राने अचानक संपर्क तोडणे, आपल्याला ग्रुप इव्हेंट मध्ये सहभागी करून न घेणे किंवा आपल्या भावना व्यक्त केल्या नंतर समोरच्या व्यक्तीने आपले प्रपोजल न स्वीकारणे असे रिजेक्शन प्रत्येकाने एकदा तरी अनुभवले असेलच. कुणी आपल्याला रिजेक्ट केले की आपण अयोग्य आणि अपूर्ण आहोत असे आपल्याला वाटू लागते.

रीजेक्शन म्हणजे काय ?

आपल्याला जेव्हा स्वीकारले जात नाही, तेव्हा त्या गोष्टीला आपण रिजेक्शन म्हणतो  त्यावेळी आपल्याला हवी असणारी गोष्ट / वस्तू / व्यक्ती आपल्या पासून दूर गेली असा आपला समज होतो, त्यामुळे आपण स्वतःला त्या अयोग्य समजू लागतो आणि सेल्फ वर्थ कमी करून घेतो.

तुम्ही कधी पुढील पैकी कोणते Rejection अनुभवले आहे का ?
✳️ शाळेत असताना अन्य विद्यार्थ्यांकडून धमकावले जाणे / एकटे पाडले जाणे.
✳️ ग्रुप मध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करणे पण बाकी लोकांकडून इग्नोर केले जाणे.
✳️ मधल्या सुट्टी मध्ये जेवण करताना एकटे असणे.
✳️ मित्रांच्या वाढदिवसाला किंवा पार्टी साठी आमंत्रण न मिळणे.
✳️ खूप आवडणाऱ्या मुलीला किंवा मुलाला प्रपोज केल्यानंतर तिचा / त्याचा नकार मिळणे.
✳️ नोकरी साठी इंटरव्ह्यू दिल्या नंतर देखील निवड न होणे.

याचसोबत घरात देखील Rejection चे अनुभव येऊ शकतात. जसे
✳️ घरात सतत टोकले जाणे, घालून पाडून बोलणे.
✳️ शारीरिक किंवा शाब्दिक हिंसा होणे.
✳️ दत्तक दिले जाणे. ( पालकांसाठी हा परोपकार असेल पण adopt होणाऱ्या व्यक्ती साठी ते Rejection असू शकते)
✳️ पालकांकडून भावना आणि मत यांवर नकारात्मक टिप्पणी आणि मस्करी केली जाणे.
✳️ तुझ्यात काही टॅलेंट नाही, त्यामुळे तू मोठी स्वप्ने बघू नको असे सतत बोलले जाणे.

वरीलपैकी बऱ्याच घटना कदाचित डायरेक्ट Rejection वाटत नसतील पण त्या देखील Rejection मध्येच येतात.

Rejection मुळे चुकीच्या श्रद्धा निर्माण होतात.

Rejection चा परिमाण हा व्यक्तीचे वय आणि विचार पद्धती यावर अवलंबून असतो, Rejection जितके तीव्र आणि कमी वयात अनुभवास येते त्याचा प्रभाव तितकाच जास्त असतो.

पौगंड अवस्थेत असणाऱ्या व्यक्ती मध्ये अनेक मानसिक बदल होत असतात, त्या वयात त्यांच्या self-concept आणि self-worth चा पाया रचला जात असतो. या वयात direct rejection पेक्षा passive rejection चा वाईट परिणाम जास्त होतो. कोणत्याही घटनेला ते स्वतःच्या विचार क्षमतेनुसार समजून घेतात आणि स्वतः बद्दलची मते बनवतात.

उदा. 12 वर्षाच्या मुलीने जर IAS होण्याचे स्वप्न पाहिले आणि तिला चुकून परीक्षेत कमी मार्क मिळाले तर घरचे सतत टोमणे मारतात की IAS काय तू तर 10 वी पण पास होशील की नाही माहीत नाही. घरच्यांना वाटते की अशा बोलण्यामुळे ती मुलगी मन लाऊन अभ्यास करेल पण उलट सतत असे बोलल्याने ती स्वतःला मठ्ठ समजू लागते. अशाच छोट्या वाटणाऱ्या रेजेक्शन ने पौगंड अवस्थेतील मुले स्वतःबद्दल गैरसमज करून घेते.

Rejection चे दुःख खूप जास्त असते, त्यामुळे एकदा rejection अनुभवले की व्यक्ती शक्यतो पुढे येणारे rejection टाळायचा प्रयत्न करते. त्यासाठी आपण स्वतःला लिमिट करून घेतो. ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते किंवा ज्या परिस्थिती मध्ये आपल्याला आधी Rejection चा अनुभव असतो अशी परिस्थिती समोर आली की मग आपण स्वतःला अयोग्य समजू लागतो आणि त्या परिस्थिती ला तोंड न देता पाठ दाखवणे पसंत करतो. उदा. प्रेमात Rejection मिळाले की मग आपण एकदम dettach होतो, आणि इथेच न थांबता पुढे पुन्हा प्रेमात पडायला देखील घाबरतो.

यात पुढील पायरी म्हणजे समोरचा आपल्याला reject करेल याच भीतीने आपण त्याला आधीच reject करून मोकळे होतो. पुन्हा आपल्याला rejection चे दुःख नको आणि आपला आपल्या आयुष्यावर कंट्रोल आहे, मी माझे निर्णय स्वतः घेतो अशी मनाची खोटी समजूत घालायला आपण anticipatory rejection चा मार्ग स्वीकारतो.

यामुळे तात्पुरते बरे वाटले तरी सेल्फ वर्थ कमी होते आणि आपण अजून उदास होतो.

Rejection चा सामना कसा करावा ?

✳️ स्वीकार

आपल्याला हवी असलेली गोष्ट किंवा व्यक्ती आपल्याला न मिळणे / आयुष्यातून निघून जाणे ह्या घटना खूपच दुःखद असतात. असे झाल्यानंतर आपला इगो सुद्धा दुखावला जातो. आपल्याला लाज वाटू लागते. कुठेही मनातील भावना व्यक्त केल्या तर आपले अजून हसे होईल अशी आपल्याला भीती असते. त्यामुळे आपण आपल्या भावना दाबून ठेवतो आणि मन divert करायला स्मोकिंग, किंवा ड्रिंक्स चा पर्याय निवडतो. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण दुःख कमी होत नाही.

पण गोष्ट / व्यक्ती आयुष्यातून निघून गेली आहे त्यासाठी स्वतःलाच दोष देणे योग्य नसते. त्यामुळे आधी आपण स्वीकारले पाहिजे की मी माझे प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. यात माझी चूक नाही. आपल्याला रडू येत असेल तर मन मोकळे रडून घ्यावे, त्या बद्दल च्या भावना लिहून काढाव्यात किंवा चित्र काढावे. मनात भावना साठवून न ठेवता त्यांना वाट मोकळी करून द्यावी म्हणजे मन हलके होते.

सोबत सेल्फ केअर आणि संयम हवे, यातून बाहेर यायला लागणारा वेळ हा आपण काय आणि किती महत्त्वाचे गमावले आहे यावर अवलंबून असतो. या दुःखातून बाहेर येण्याचे काही मार्ग माझ्या एका लेखात दिलेले आहेत.
लेख – https://www.mysbsindia.com/articles/grief/

✳️ स्वतःला दोष देणे बंद करा

आपण का reject झालो हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते, पण प्रत्येक वेळी आपल्या rejection चे कारण स्पष्ट नसते. त्यामुळे आपण आपल्याच मनाने सर्व अंदाज बांधत असतो. आपण शोधतो की आपले काय चुकले, मी कुठे माती खाल्ली ?, मी काय निर्णय घेताना चुकलो ? माझे कोणते बोलणे चुकीचे होते ? कदाचित लहानपणी आलेले अनुभव तुम्हाला स्वतःला दोष देण्यासाठी भाग पाडत असतील. पण मोठे झाल्यानंतर त्या परिस्थितीची दुसरी बाजू देखील बघणे गरजेचे आहे.

समजा नोकरी साठी इंटरव्ह्यू दिल्या नंतर तुमची निवड झाली नाही, तुमच्या नुसार तुम्ही त्या नोकरी साठी पात्र होतात पण तुमच्या ऐवजी दुसरे कुणी निवडले गेले तर तुम्हाला स्वतःला दोष देता की कदाचित मी इंटरव्ह्यू मध्ये काही चुकीचे बोललो असेन किंवा माझे गुण कमी असतील. पण कदाचित समोरची व्यक्ती तुमच्या हून अधिक सक्षम असू शकते किंवा त्या व्यक्ती कडे अनुभव जास्त असू शकतो किंवा त्याला कुणाच्या तरी reference ने नोकरी मिळाली असेल, त्यामुळे सर्व बाजूंनी घटना समजून मगच मते बनवा.

✳️ लवचिक रहा

महापुरात मोठी मोठी झाडे वाहून जातात पण लवचिक लव्हाळे, गवत हे टिकून राहते. त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली आणि तुम्ही कितीही पाठी गेलात तरी खचून जाऊ नका, bounce back व्हायचा प्रयत्न करा. भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानात स्वतःला व्यस्त करा. आपले सकारात्मक गुण, आपल्या कमतरता यांवर काम करा. इगो मुळे कुठेही स्वतःचे नुकसान करून घेऊ नका.

✳️ सातत्य

माझ्या एका मित्राने बोलता बोलता सहज सांगितले की त्याने 16 वेळा नकाराचा सामना केला होता, त्याच प्रमाणे एडिसन देखील 1000 वेळा अपयशी झाला होता पण याला नकारात्मक पद्धतीने न घेता आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवा. तुम्ही स्पर्धेत आहात तोपर्यंत जिंकण्याची आशा कायम असते. कोणत्याही नाकारला पर्सनली घेऊ नका. फक्त रोज थोडी थोडी आणि सातत्यपूर्ण प्रगती करत रहा.

आपण कोणत्याही वयात, कधीही पुन्हा सुरुवात करू शकतो, कधीही कंटाळा करू नका. नकार मिळाला म्हणून स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी किंवा घाई मध्ये कोणतीही गोष्ट स्वीकारू नका. मग ते प्रेम असेल किंवा नोकरी काहीही. नेहमी संयम ठेवा आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा.

नकार जर सकारात्मक पद्धतीने स्वीकारला तर तो आपल्या विकासाचा पाया बनू शकतो, त्यातून आपण नवनवीन गोष्टी शिकू शकतो.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.