fbpx
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

एखाद्या ठिकाणी उशिरा जाणे हे आपल्यासाठी अपमानास्पद असते, कधीतरी चुकून अशी घटना घडली तर लोक सुद्धा स्वीकार करतात पण सतत जर आपल्याला उशीर होत असेल तर लोकांच्या मनात आपली प्रतिमा खराब होऊ लागते. अनेकदा प्रयत्न करून देखील ही सवय ही सुटत नाही, आपण ज्यांना वाट बघायला लावतो ते आपल्या बद्दल नकारात्मक विचार करू लागतात आणि त्यामुळे आपले इम्प्रेशन देखील खराब होते. हे सर्व टाळण्यासाठी आज आपण काही टिप्स पाहणार आहोत.

✳️ Re-estimate
कोणत्या गोष्टीला किती वेळ लागेल हे समजून घ्या.
आपण प्रचंड आशावादी असतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एकाच बाजूने विचार करत असतो. अन्य शक्यता तपासून न पाहिल्यामुळे एखाद्या कामासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला नीट ठरवता येत नाही. त्यामुळे कधीही वेळेचे नियोजन करताना अंदाजापेक्षा 25-30% जास्त वेळ त्या कामासाठी काढून ठेवावा. उदा. 1 तासाचे काम असेल तर 1 तास 15 मिनिट , प्रवास 30 मिनिटाचा असेल तर 45 मिनिटाचा अंदाज बांधावा.

✳️ छोट्या छोट्या गोष्टींची दखल घ्या.
जसे ट्रॅफिक, गाडीचे पार्किंग, पार्किंग पासून पुढे चालत जाण्यासाठी लागणारा वेळ, पेट्रोल किंवा अन्य कामांसाठी लागणारा वेळ, लहान मुले असतील तर त्यांची आवराआवर अशा कमी महत्त्वाच्या आणि साहजिक वाटणाऱ्या गोष्टींसाठी लागणारा वेळ देखील लक्षात घ्या. गूगल मॅप जर सांगत असेल की तुमचे डेस्टिनेशन 20 मिनिट दूर आहे तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही पार्किंग आणि गाडीतून उतरल्यानंतर त्या व्यक्ती पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ दोन्ही मिळवून सांगा मध्ये जर fuel साठी थांबणार असाल तर तो वेळ देखील त्यात add करा.

✳️ कामात काम करणे टाळा.
खरतर हे सुद्धा आपल्या आशावाद याच प्रकारात मोडते पण याची व्याप्ती मोठी आहे, अनेकदा आपण एका कामासाठी निघालो की रस्त्यात आपल्याला दुसरी कामे सुचतात, आणि त्यात आपला वेळ जातो. उदा. ऑफिस डिनर साठी जाताना वाटेत पुस्तकाचे दुकान आहे तर नवीन पुस्तके पाहू आणि मग जाऊ हा स्वभाव किंवा जताना car किंवा बाईक वॉश करू 10 मिनिट जास्त लागतील, त्यात काय ! हा attitude.

✳️ 5 मिनिट अजून झोपतो असे बोलून गजर snooze करणेधोक्याची घंटा.
सकाळी गजर झाला की साहजिक आपल्याकडून snooze बटन दाबले जाते. मनात विचार येतो की 5 मिनिट अजून झोपतो आणि मग उठून पटापट आवरेन. मग उठायला उशीर झाला की आपल्याला स्ट्रेस येतो. स्ट्रेस कोणत्याही कामासाठी चांगला नसतो त्यामुळे परिस्थिती अजून वाईट होते. म्हणून अलार्म सेट करताना मनात निर्धार करा की अलार्म वाजला की लगेच उठायचे. ही सवय लागली की रात्री सुद्धा लवकर झोप येते.

✳️ शब्दांचे अर्थ व्यवस्थित समजून घ्या.
मला थिएटर ला 6 वाजता पोहचायचे आहे आणि movie 6 वाजता सुरू होणार आहे, या दोन वाक्यात खूप अंतर आहे. जर तुम्ही 6 वाजताच्या चित्रपटासाठी सिनेमागृहात 6 वाजता पोहचले तर मग तिकीट चेक करून घेणे, आपली सीट शोधणे यात अजून 5- 10 मिनिटे जातात आणि चित्रपटाची सुरुवात झालेली असते.
त्यामुळे असे प्लॅन करताना शब्दांचे अर्थ योग्य प्रकारे लावा. मीटिंग 2 वाजता सुरू होणार आहे, डेट 8 वाजता आहे. म्हणजे नियोजन करताना आपण त्या ठिकाणी किमान 15 – 20 मिनिट आधी पोहचू.

✳️ लवकर पोहचणे म्हणजे वेळ वाया घालवणे नाही.
आपल्यापैकी अनेकांना वेळ वाया घालवायला अजिबात आवडत नाही, डॉक्टर कडे किंवा आपल्या आवडत्या हॉटेल मध्ये आपण ठराविक वेळ/ अपॉइंटमेंट ठरवली होती पण तरी आपल्याला वाट बघावी लागली तर राग येतो. पण कुठे लवकर पोहचलो तर ही भावना अजिबात नसते. जेव्हा तुम्ही लवकर जाता तेव्हा तुमचे इम्प्रेशन देखील चांगले पडते.
अश्या वेळी लवकर जाऊन तुम्ही त्या ठिकाणचे निरीक्षण करू शकता, किंवा पुस्तके वाचू शकत अगदीच काही शक्य नसल्यास फोन वर जुने फोटो पाहणे, गाणी ऐकणे असे काही आपण करूच शकतो. मी अश्या वेळी नातेवाईकांना फोन करतो, म्हणजे संपर्क देखील राहतो आणि वेळेचा सदुपयोग होतो.

✳️ 10 मिनिट आधी लोकेशन वर जा.
जे लोक खूप वक्तशीर असतात त्यांसाठी लेट होणे हा insult / अपमान असतो. अनेकदा 12 वाजताच्या मीटिंग साठी 1 मिनिट उशीर झाला तरी समीरची व्यक्ती चिडते. हल्ली अनेक कंपनी मद्ये टाईम base attendence मशीन असते ज्यात सेकंदाला देखील महत्त्व आहे. अश्या वेळी इच्छित ठिकाणी 10 मिनिट आधी जाणे केव्हाही योग्य ठरते.

✳️ पूर्वतयारी करा.
बरेच लोक सकाळी उठल्यावर अनेक कामे करतात. कपडे इस्त्री करणे, बॅग भरणे, महत्वाचे कागदपत्र आणि फाईल शोधणे इत्यादी. त्यात जर लाईट गेले किंवा काही विसरलो तर अडचण होते आणि उशीर होण्याचे चांस वाढतात त्यामुळे शक्य होतील तितकी कामे रात्री करून ठेवा. दुसऱ्या दिवशी घालायचे कपडे इस्त्री करणे, बॅग मध्ये महत्वाच्या वस्तू ठेवणे हे आपण सहज करू शकतो.

✳️ प्लॅनर चा वापर करा.
दिवसभरातील आपली कामे आणि त्यांची वेळ लिहून ठेवा. कोणालाही वेळ देताना प्लॅनर बघा आणि मग शब्द द्या. दिवसभराचे नियोजन करताना प्लॅनर ची खूप मदत होते. एखाद्या कामात उशीर होत असेल तर पुढील व्यक्तीला आधीच तुम्हाला उशीर होणार आहे ते स्वतःहून सांगा. त्या व्यक्तीच्या फोन ची वाट बघू नका.

✳️ अनुभव द्या.
पुढे येणारी इव्हेंट लक्षात घ्या आणि त्यासाठी योग्य वेळेत पोहचा. तुम्हाला अचानक तुमचा मूड फ्रेश वाटू लागेल, स्ट्रेस आणि guilt ची भावना दूर होईल. तुमचा आत्मविश्वास देखील वाढू लागेल आणि समाजात देखील तुम्हाला किंमत मिळू लागेल. हा अनुभव आपण घेतला की मग याची सवय आपल्याला होऊ लागते आणि मग वेळेत सर्व करायची सवय लागते.

माझ्या आजवरच्या अनुभवानुसार 4 प्रकारचे लोक हे लेट होण्याचे चान्स जास्त असतात.

1️⃣ PERFECTIONIST – सगळं काही परफेक्ट असल्याशिवाय हे लोक घर सोडत नाहीत, त्यामुळे यांना उशीर होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही असे असाल तर मोठे चित्र बघा. तुम्ही सकाळी कपडे न धुता कामाला जाणे आणि मीटिंग साठी कुणाला वाट बघायला लावणे यातील काय महत्वाचे आहे ते ठरवा. प्रायोरिटी ठरवणे महत्त्वाचे.

2️⃣ CRISIS MAKER – यांना लेट व्हायची हौस नसते पण यांना deadline जवळ आली की काम करायला आवडते, adrenalin rush हे याचे मुख्य कारण असते. यावर उपाय म्हणजे शारीरिक व्यायामाने adrenalin हार्मोन शरीरात निर्माण करणे.

3️⃣ DEFIER – हे थोडी क्रांतिकारी प्रकारचे लोक असतात, समाज माझ्यावर का बंधन घालत आहे ? मी त्यांचं का ऐकून घेऊ ? असा विचार असतो म्हणून हे आपल्या सोयीनुसार सगळीकडे जातात. यावर उपाय म्हणजे सगळेच आपल्यावर काही ना काही लादत आहेत असा समज दूर करून सत्य स्वीकारले की हे वेळेत पोहचतात.

4️⃣ DREAMER – दिवसा स्वप्न बघणारे लोक हे सगळ्या बाबतीत अती विश्वासू असतात, झोपेतून उठून सगळं आवरून इच्छित ठिकाणी आपण 10 मिनिटात पोहचू असा यांचा समज असतो. यावर उपाय म्हणजे वास्तव जगणे आणि सत्य स्वीकारणे, कोणत्या गोष्टीला किती वेळ लागेल हे लिहून घेणे देखील मदत करते.

त्याच बरोबर OCD असणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील लेट होण्याचे चांस जास्त असतात.

वरील टिप्स सर्वांसाठीच उपयुक्त आहेत आशा करतो की आपल्याला यांची मदत होईल.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.