fbpx
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

Move on करणे ही व्यक्तीसाठी सर्वात कठीण गोष्ट असते, प्रत्येक व्यक्ती त्याच्या पद्धती नुसार move on होत असते. प्रत्येकाला लागणारा वेळ देखील वेगवेगळा असतो. प्रत्येकजण आयुष्यात कधी न कधी या परिस्थितीतून जातोच, एका सर्वे नुसार ब्रेकअप किंवा एकतर्फी प्रेमातून move on करण्यासाठी सरासरी 18 महिन्यांचा कालावधी लागतो. सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे लोक वेळ घेत असले तरी ते move on होतात आणि नंतर सोबत अनुभवाचे गाठोडे घेऊन जगतात, ज्यामुळे त्यांना mature व्हायला देखील मदत होते.

Move on होण्याचे टिप्स समजून घेण्याआधी आपण एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की ही प्रोसेस खूप कठीण आहे, हा रस्ता देखील सुरुवातील त्रासदायक असणार आहे. ही प्रोसेस एका रात्रीत पूर्ण होणारी नाही किंवा यातून बाहेर यायला कोणताही जादूचा मंत्र अस्तित्वात नाही.

प्रत्येक व्यक्ती युनिक असते, त्यांचे रीलेशन आणि त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा असतो. एखादी व्यक्ती महिनाभरात move on होते पण काही लोकांना वर्ष लागते, त्यामुळे या प्रोसेस मध्ये संयम आणि सातत्य ठेवणे खूप आवश्यक असते. कधी कधी खूप वाईट अनुभव देखील येतात त्यामुळे खचून न जाता विश्वास ठेवून प्रयत्न करणे आवश्यक असते.

जसं मी लेखात आधी नमूद केले की व्यक्ती नुसार move on होण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे याच्या कोणत्याही निश्चित पायऱ्या नाहीत पण माझ्या अनुभवातून मी तयार केलेले गाईड तुमच्यासमोर मांडतो.

✳️ आपले जीवन एक प्रवास आहे हा समज.
आपण दुःखी असताना कायम आजूबाजूला असणारे सुखी लोक बघून अजून खिन्न होतो, पण जे लोक आज आपल्याला सुखी दिसत आहेत ते सुद्धा कधीतरी दुःखी होते हे आपण समजून घ्यायला हवे, सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या बाजू आहेत, ब्रेकअप किंवा एकतर्फी प्रेमात अपेक्षाभंग झाला की जगाचा अंत झाला असा आपला समज होतो, पण तसे अजिबात नसते, नात्याचा अंत हा आयुष्याचा अंत असू शकत नाही हे स्वीकारून आपण स्वतःचे अस्तित्व समजून घ्यायला हवे. प्रवासात अडथळे आले म्हणून आपण आपण प्रवास थांबवत नाही, तर त्यावर मात करून सतत पुढे जातो तेच जीवनाच्या बाबतीत देखील सत्य आहे.

✳️ आपली नकारात्मक विचार पद्धती थांबवणे.
अशा काही घटना घडल्या की आपली नकारात्मक विचार पद्धती जागृत होते आणि ती आपल्याला दोष देते, आपल्यावर दया दाखवते आणि आपल्याला चुकीच्या विचारात गुंतवून ठेवते. ब्रेकअप नंतर, किंवा अपेक्षाभंग झाल्यानंतर येणारे काही नकारात्मक विचार –
• ती / तो तुला सोडून जाणारच होते.
• आता तुझ्याकडे काहीच नाही.
• तुझ्यावर कधीच कुणी प्रेम करणार नाही.
• तू नालायक आहेस.
• लोक विश्वासाच्या लायक नाहीत.
• समोरची व्यक्ती आऊट ऑफ लीग आहे.
• हे विसरायला व्यसन करणे योग्य आहे.
• मी एकटे राहिलेले चांगले.
या आवाजावर आपण फोकस करत राहिलो तर यातून बाहेर यातची प्रोसेस कठीण होते, म्हणून या विचार पद्धतीला आपला मोठा शत्रू समजायचे आणि सकारात्मक विचार करायचे.

✳️ वास्तव स्वीकारा
आपण अनेकदा रेलेशन किंवा एकतर्फी प्रेमातील चांगल्या आठवणी मनात ताज्या करतो आणि वाईट किंवा त्रासदायक गोष्टी इग्नोर करतो. त्यामुळे आपण Denial अवस्थेत जातो, आपल्या मनात येते की नाते तुटू शकत नाही, हे माझ्यासोबत होऊच शकत नाही असे विचार येतात आणि आपण बाहेर येणे गुंतागुंतीचे करतो. त्यामुळे तटस्थ राहून वास्तव स्वीकारणे गरजेचे ठरते. आपण आता वेगळे झाले आहोत किंवा एक तर्फी प्रेम आहे पण त्यातून काही निष्पन्न होत नाहीये हे जाणवल्यास स्वीकारायचे की कुठेतरी थांबण्याची वेळ आली आहे.

✳️ कल्पना विश्वातून बाहेर या.
अनेकदा आपण प्रेम करत असलेल्या व्यक्ती सोबत एका कल्पना विश्वात जगत असतो, मनातल्या मनात विचारांचे महाल बनवतो, ज्या गोष्टी सत्यात नाहीयेत त्याची कल्पना आपल्याला आनंद देते म्हणून मग आपण त्यात रमत जातो आणि मग त्यात बंदिस्त होऊ जातो. अपेक्षा भंग झाला की मग आपण दोन गोष्टींसाठी दुःखी होतो, पहिली म्हणजे दूर झालेली व्यक्ती आणि दुसरे आपण तयार केलेले कल्पना विश्व. या दुःखामुळे आपण अडकून पडतो त्यामुळे शक्य तितक्या लवकर या आभासी कल्पना विश्र्वाचा त्याग करावा.

✳️ भावना समजून घ्या आणि त्या एक्स्प्रेस करा.
वाईट वाटणे, रडू येणे या स्वाभाविक भावना आहेत, पुरुष किंवा स्त्री कुणीही असो त्यांनी आपल्या भावना अजिबात दाबून ठेऊ नयेत. त्यांनी त्या व्यक्त करून मोकळे व्हावे. प्रत्येक भावना ही 3 स्टेज मधून जात असते. प्रथम भावनेचा उगम मग तिचा उद्रेक होतो आणि शेवटी तीव्रता कमी होते. या स्टेज मध्ये उद्रेक होताना स्वतःला इजा होईल असे काही करू नका. स्वतःचे छान मित्र बना म्हणजे भावना समजून घेणे सोपे होईल.

✳️ चर्चा करा
तुमच्यासोबत जे काही झाले आहे, तुम्ही ज्या परिस्थिती मधून जात आहात त्या संबंधी तुमच्या मित्र किंवा जवळच्या व्यक्ती सोबत मनमोकळे पणाने बोला, कुणीही उपलब्ध नसल्यास किंवा विश्वास ठेवणे कठीण जात असेल तर थेरपिस्ट सोबत बोला. Sympathy मुळे आपल्याला मनोबल मिळते. तुमच्या सारख्या परिस्थिती मधून गेलेले व्यक्ती यांच्यासोबत चर्चा करून आपले दुःख कमी वाटायला लागते.

✳️ आपली attachment स्टाईल समजून घ्या
काही रिसर्च नुसार ज्यांनी सेल्फ इस्टीम strong असते, रेजेक्शन ची भीती कमी असते आणि attachment लेव्हल देखील कमी असते असे लोक अपेक्षाभंग सहज सहन करतात आणि move on होतात. आपले सेल्फ एस्टीम आणि dependency यांवर आपण किती attach होणार हे अवलंबून असते, त्यामुळे आपली सेल्फ इस्टीम वाढवायचा प्रयत्न करा.

✳️ स्वतःवर विश्वास ठेवा
स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या एका अहवालानुसार एखादी व्यक्ती recover होण्यासाठी त्याचा स्वतः बद्दलचा समज आणि विश्वास हे दोन घटक खूप महत्त्वाचे असतात. ज्यांना वाटते की आपले व्यक्तिमत्व हे कायमस्वरूपी असेच राहणार ते स्वतःला दोषी समजतात आणि ज्यांना वाटते व्यक्तिमत्त्वात बदल / विकास करणे शक्य आहे ते अपेक्षा भंगाकडे एक विकासाची आणि स्वतःमध्ये बदलाची संधी म्हणून बघतात. त्यामुळे जर तुम्ही स्वतःला blame करत असाल तर सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणे गरजेचे आहे.

✳️ करुणा
करुणा म्हणजेच self-compassion , कोणत्याही परिस्थतीत स्वतःला चांगली वागणूक देणे हे फार महत्त्वाचे आहे, self-compassion चे 3 फायदे
• self-compassion मुळे आपण स्वतःला judge करत नाही. त्यामुळे नकारात्मक विचार येत नाहीत.
• एकटे राहण्याचे विचार येत नाहीत.
• सतत वाईट गोष्टीचे चिंतन न करता आपण मानसिक रित्या जागरूक राहतो.
यामुळे आपण स्वतःला शक्ती देत असतो.

✳️ Mindfulness
Mindfulness मुळे आपण आपले विचार आणि भावना त्यांचा अती विचार न करता, किंवा स्वतःला judge न करता स्वीकारतो. ध्यान आणि Mindfulness ह्यांच्या समागमातून आपल्याला मानसिक शांती मिळते. सतत येणारे नकारात्मक विचार टाळण्यासाठी याचा प्रचंड फायदा होतो. आपल्या भोवती घडणाऱ्या सर्व गोष्टींचा जागरूकतेने घेतलेला आढावा आपल्या शारीरिक, मानसिक उन्नतीचा मार्ग मोकळा करतो.

✳️ Self care
स्वतःची योग्य मानसिक आणि शारीरिक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, आरोग्यासाठी वाचन, चांगल्या विचारांचे मनन आणि चिंतन करणे, योग आणि प्राणायाम, ध्यान, चांगल्या आठवणी आणि कर्म आठवून त्यावर खुश होणे. नकारात्मक विचार टाळणे, व्यायाम करणे, ट्रेकिंग ला जाणे, सूर्यप्रकाशात चालणे, योग्य आहार घेणे, आवडते टीव्ही शो बघणे, छंद जोपासणे, संगीत ऐकणे हे मार्ग आपण अवलंबू शकतो.

✳️ नवीन गोष्टी शिका
आपण स्वतःला शोधणे खूप आवश्यक असते, त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागतो. नोकरी किंवा व्यवसाय करताना देखील नवीन गोष्टी शिका, त्यातून मिळणारा आनंद आपल्याला अपेक्षाभंगाचे ओझे कमी करायला मदत करेल. एखाद्या ठिकाणी फिरायला जाणे किंवा एनजीओ मध्ये काम करणे असे काही नवीन काम आपण करू शकतो. त्याच सोबत आपल्या जुन्या आवडीच्या गोष्टी देखील करणे सोडू नका, जुने छंद देखील जोपासा.

अपेक्षाभंग दूर करण्यासाठी सेल्फ इस्टीम, सेल्फ कॉन्फिडन्स आणि आपले प्रयत्न फार महत्वाचे आहेत, त्याचबरोबर समाजात राहणे आणि मित्रांसोबत मन मोकळे बोलणे हे सर्वात जास्त फायदेशीर ठरते.

लक्षात ठेवा की जेव्हा आयुष्यात अपेक्षाभंग होतो तेव्हा काही मोठे आणि चांगले तुमची वाट बघत असते.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.