fbpx

Obsessive- Compulsive Disorder (OCD)

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

OCD हा एक मानसिक आजार आहे ज्यामुळे व्यक्तीला सतत अनावश्यक विचार / संवेदना (Obsession) जाणवतात किंवा कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा करायची इच्छा  (compulsions) होते.काही व्यक्तींमध्ये दोन्ही गोष्टी सुद्धा जाणवतात.

OCD म्हणजे सतत नखे कुरतडणे किंवा नकारात्मक विचार करणे नाही, अगदी सोपी उदाहरणे द्यायची झाली तर एखादा रंग चांगला आहे किंवा एकदा वाईट आहे असा विचार करणे हे पण Obsession च आहे, कोणत्याही वस्तू ला स्पर्श केला की ती खराबच आहे या भीतीने सतत हात धुणे हे compulsion चे उदाहरण आहे. ह्या गोष्टी त्या व्यक्तीला करायच्या नसतात पण तरी त्या होतात आणि त्यांवर ताबा मिळवणे कठीण जाते.

रोज आपण बरेच विचार किंवा काही गोष्टी पुन्हा पुन्हा करत असतो, पण ocd असणाऱ्या लोकांमध्ये ह्या गोष्टी कंट्रोल मध्ये नसतात, त्या करण्यात व्यक्तीला कोणताही इंटरेस्ट नसतो, काम, सोशल किंवा फॅमिली लाईफ मध्ये त्यामुळे प्रॉब्लेम येऊ लागतात, दिवसातून किमान तासभर ते ता unproductove गोष्टीत व्यस्त असतात.

ocd चे प्रकार आणि symptoms:
ocd चे अनेक प्रकार आहेत पण ते सोयीसाठी 4 मुख्य कॅटेगरी मध्ये विभागले जातात.
• चेकिंग – लॉक लावला आहे की नाही, गजर बंद केला का ? किंवा गॅस तर सुरू नाहीये ना ? आपल्याला कोणता आजार तर नाहीये ना असे विचार सतत येणे.
• दुषितिकरण – contamination स्टेज मध्ये 2 उपप्रकार आहेत, एखाद्या वस्तू ला हात लावला की हात धुणे, वस्तू खराब झाल्या आहेत असे समजुन सतत साफसफाई करणे मानसिक प्रकारात आपल्याला कुणीतरी कचऱ्या सारखी वागणूक देत आहे असा समज करून घेणे.
• Symmetry – सर्व वस्तू क्रमाने किंवा विशिष्ठ पद्धतील लावणे तसे न झाल्यास चिडचिड करणे.
• रुमिनेशन – एकाच पद्धतीचे विचार करणे, विशेषतः एखाद्या समस्येची कारणे आणि धोके यांचा विचार करणे, बरेचदा यात नकारात्मक आणि त्रासदायक विचार असतात.

OCD असणाऱ्या लोकांना माहीत असते की त्यांचे विचार किंवा actions या योग्य नाहीत, ते त्या गोष्टी एंजॉय ही करत नाहीत पण त्यांना त्या थांबवणे ही कठीण जाते, थांबवायचा प्रयत्न केल्यास मग त्यांना मानसिक त्रास होतो आणि पुन्हा ते तिकडेच वळतात.

Obsessive विचारांचे नमुने
• स्वतःला किंवा दुसऱ्याला काही इजा होईल असा विचार.
• सतत डोळे मिचकावत बोलणे, जोरात श्वास घेणे, शरीराच्या अनियंत्रित हालचाली करणे.
• आपला पार्टनर प्रामाणिक नाही असा विचार कारण नसताना मनात येणे.

Compulsive वागणुकीचे नमुने
• गोष्टी ठराविक वेळा पुन्हा पुन्हा करणे, lucky नंबर पर्यंत रिपीट करणे.
• पायऱ्या किंवा random गोष्टी मोजणे.
• पब्लिक टॉयलेट, दाराच्या कड्या किंवा लॉक ला हात लावणे टाळणे, हाथ मिळवताना भीती वाटणे.

OCD ची काही कारणे

डॉक्टर किंवा रिसर्च करणार्यांना अजून याचे काही ठोस कारण सापडले नाही, पण स्ट्रेस मुळे symptoms अजून धोकादायक होत जातात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ocd चे प्रमाण जास्त आढळते, शक्यतो टीन age किंवा तरुण वयातील व्यक्तीमध्ये ocd चे प्रमाण जास्त आढळते.

Statistic नुसार पुढील काही गोष्टींमुळे व्यक्तींमध्ये ocd विकसित होऊ शकतो.
• पालक, भाऊ – बहीण यांपैकी कुणाला तरी ocd असणे.
• मेंदू मधील विशिष्ठ भागातील फरक.
• डिप्रेशन आणि स्ट्रेस.
• एखादा trauma.
• लहानपणी शारीरिक किंवा सेक्शुअल abuse

OCD साठी कोणतेही निश्चित उपचार पद्धत नाही पण पुढील मार्ग आपण अवलंबू शकतो जेणेकरून symptoms manage करता येतील.

• CBT- टॉक थेरपी, विचारांचे पॅटर्न बदलायला मदत होते आणि स्ट्रेस कमी होतो, यामुळे ओबसेशन वर नियंत्रण आणता येते.
• Relaxation- योगासने, प्राणायाम आणि ध्यान.
• औषधे – serotonin साठी काही औषधे दिली जातात. यासाठी psychiatrist मार्ग सुचवतात.
• Neuro modulation – जर cbt किंवा औषधे यांनी फरक पडला नाही तर मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना इलेक्ट्रिक शॉक द्वारे modulate केले जाते.
• TMS (transcranial magnetic stimulation)- चुंबकीय क्षेत्राचा वापर करून मेंदूच्या ठराविक भागांना नियंत्रित केले जाते, त्यातून symptoms कमी व्हायला मदत होते.

काही misconceptions:
• Looks – body dysmorphic disorder ज्यात आपल्या दिसण्यात असलेला छोटा दोष पण मोठा वाटतो.
• Hoarding disorder – वेगवेगळ्या वस्तू साठवयचा, मागवयचा आणि सजवायचा छंद.
• शारीरिक गंध – आपल्या घामाचा वास कसा येतोय याचा अती विचार.
• केस ओढणे / आजारपण आहे असे वाटणे.
• नखे कुरतडणे किंवा नखाखालील स्किन चावणे.

OCD चे निदान कसे होते ?

तज्ञ समुपदेशक किंवा psychiatrist हे काही प्रश्नांच्या आधारे आणि निरिक्षणातून याचे निदान करतात.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.