fbpx

Oxytocin – The Love Hormone

images.jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

Oxytocin हे महत्वाचे हार्मोन आहे जे एका न्युरो ट्रान्समीटर सारखे काम करते. प्रजनन, प्रसूतीच्या वेळी होणारे आकुंचन ( contractions before birth) आणि दुग्ध निर्मिती यांसाठी हे हार्मोन जबाबदार असते. तसेच सामाजिक नातेसंबंध उदा. आई आणि नवजात बाळाचे bonding, प्रेम संबंध ( Relationships) तसेच गृपमध्ये काम करतानाचा आपला स्वभाव आणि भावना ह्या सर्व गोष्टींवर देखील oxytocin चा प्रभाव असतो. Oxytocin ची निर्मिती hypothalamus मध्ये होते आणि नंतर ते pituitary ग्रंथी द्वारे रक्तात सोडले जाते.

Oxytocin आणि Dopamine चा संबंध –

Dopamine, Serotonin आणि Oxytocin हे आपले हॅप्पी हार्मोन आहेत.
जेव्हा आपण कोणत्याही व्यक्ती बद्दल काही फील करतो तेव्हा reward सिस्टीम जागृत होते, dopamine निर्माण होते आणि मग serotonin ची पातळी वाढू लागते. त्यानंतर pitutary ग्रंथी oxytocin रिलीज करते. त्यामुळे आपल्याला अती आनंद होतो. यालाच मन मे लड्डू फुटना किंवा butterflies in stomach असे म्हणतात.

Oxytocin ला love hormone का म्हणतात ?

Oxytocin ला cuddle hormone” किंवा “the love hormone” असे म्हणतात कारण याचा प्रेमाचे संबंध / ऋणानुबंध प्रस्थापित करण्यात याचा मोठा वाटा असतो. अभ्यासातून असे लक्षात येते की Oxytocin आई आणि नवजात अर्भकाचे नाते मजबूत करते, आणि प्रेमी युगुलांचे नाते दृढ करायचे देखील काम करते, रिसर्च मध्ये असे निदर्शनास आले की orgasm च्या वेळी आपली oxytocin पातळी वाढलेली असते. त्याच बरोबर oxytocin मुळे आपण प्रो सोशल होतो असा काही तज्ञांचा अंदाज आहे.

Oxytocin मुळे पुढील भावना / सवयी डेव्हलप होतात –

✳️ विश्वास
✳️ टक लाऊन पाहणे ( स्टेअर करणे)
✳️ सहानुभूती
✳️ नात्याबद्दलच्या मेमोरीज
✳️ निष्ठा
✳️ सकारात्मक संभाषण
✳️ नाते संबंध यांचे दृढीकरण

Oxytocin ची निर्मिती कधी होते ?

✳️ बाळ जेव्हा आई चे स्तन्य चोखू लागते तेव्हा.
✳️ मिठी मारणे, cuddle करणे.
✳️ संभोग / हस्तमैथुन करताना.

Oxytocin चा थेरपी मध्ये काही फायदा होतो का ?

थेरपी मध्ये Oxytocin चा वापर करता येईल की नाही यावर अजून संशोधन सुरू आहे, बऱ्याच तज्ञांच्या मते ऑटीझम असलेल्या व्यक्तींमध्ये सामाजिक interaction वाढवण्यासाठी आणि स्ट्रेस तसेच anxiety चे दुःख कमी करण्यासाठी, त्याचबरोबर प्रसूती नंतर येणारे डिप्रेशन म्हणजेच postpartum depression साठी oxytocin उपयुक्त ठरू शकते. रागाचे नियंत्रण आणि रागात होणारी हिंसा थांबवण्यासाठी देखील oxytocin चा वापर होऊ शकतो का यावर संशोधन सुरू आहे.

काही देशात oxytocin नेसल स्प्रे चा वापर करून कस्टमर च्या मनात विश्वासाची भावना निर्माण करण्याचे काम सेल्समन करतात.

Oxytocin चे वैद्यकीय क्षेत्रातील फायदे –

Oxytocin हे एक prescription drug आहे, मेडिकल क्षेत्रात ते Pitocin नावाने उपलब्ध आहे जे birth contractions सुरू करण्यासाठी देतात. त्यामुळे प्रसूती नंतर होणारा रक्तस्त्राव देखील थांबतो, परंतु या औषधामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि internal bleeding सुद्धा होऊ शकते. गर्भपात झाल्यानंतर देखील काही केसेस मध्ये वरील औषध दिले जाते.

पुरुषांमध्ये Oxytocin निर्माण होते का ?

हो, पुरुषांमध्ये देखील Oxytocin तयार होते, Oxytocin चा संबंध sperm movement आणि testosterone ची निर्मिती यांच्याशी आहे.

Oxtytocin चे नकारात्मक परिणाम

आजवर आपण Oxtytocin ची सकारात्मक बाजू अनेक ठिकाणी वाचली असेल पण 2005 नंतर झालेल्या संशोधनात या हार्मोन च्या नकारात्मक प्रभावाची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
✳️ मत्सर / Envy – ही भावना वाढीस लागते. दुसऱ्याकडे जे आहे ते मला पण मिळावे ही इच्छा होते, टीन age मध्ये मित्रांचे गर्ल फ्रेंड / बॉय फ्रेंड बघून स्वतः ला देखील पार्टनर असावा अशी इच्छा होणे देखील याचा भाग असू शकतो.
✳️ ज्या स्त्रिया तणावपूर्ण रेलेशनशिप मध्ये असतात त्यांच्यात सुद्धा oxytocin ची मात्रा जास्त असल्यास त्या सोशल काँटॅक्ट वाढवतात असे निदर्शनास आले. काही स्टडीज extra maritial अफेयर साठी सुद्धा ह्या हार्मोन ला दोषी मानतात.
✳️ Relationship मध्ये असताना पाहिले 6 महिने दोन्ही पार्टनर मध्ये oxytocin ची मात्रा योग्य असते नंतर ती कमी होऊ लागते, त्यामुळे शक्यतो 6 महिन्यानंतर वाद होऊ लागतात.
✳️ Groupism, favoritism and prejudice thinking चे प्रमाण वाढते – आवडत्या व्यक्ती साठी झुकते माप देणे, त्याचे अनेक अपराध पोटात घालणे हे कॉमन होते.

सर्व नकारात्मक परिणाम हे परिस्थिती आणि व्यक्तीचा स्वभाव / व्यक्तिमत्व यांवर अवलंबून असतात.

Oxytocin चे प्रमाण कसे वाढवावे ?

✳️ योग ( किमान महिनाभर केल्यास छान रिझल्ट मिळतात, सामाजिक बांधिलकी वाढते.)
✳️ आवडती गाणी ऐकणे किंवा music कंपोस करणे.
✳️ मसाज घेणे किंवा देणे. ( टच ने खूप फरक पडतो)
✳️ पार्टनर किंवा प्रिय व्यक्तीला आपण त्यांची किती काळजी करतो हे सांगणे.
✳️ मित्रांसोबत वेळ घालवणे. (मिठी मारणे किंवा टाळ्या देणे.)
✳️ ध्यान करणे, त्यावेळी आपल्या प्रियजनांना विचार करणे.
✳️ अर्थपूर्ण गप्पा मारा – मित्र किंवा कुणासोबत ही अर्थपूर्ण बोला त्यात सहानुभूती आणि विश्वासाची भावना असू द्या.
✳️ आपल्या प्रिय व्यक्ती साठी जेवण बनवा आणि सोबत जेवण करा.
✳️ संभोग – पार्टनर ची पर परवानगी आवश्यक.
✳️ मीठी मारणे, खांद्यावर हात ठेवणे किंवा cuddle करणे.
✳️ दुसऱ्या व्यक्ती साठी उपयुक्त काम करा, उदा. घरात काम करणाऱ्या मावशी ला साडी गिफ्ट करा.
✳️ पाळीव प्राणी – विशेषतः कुत्रा पाळावा, त्याची निष्ठा आणि प्रेमळ स्वभाव आपल्याला आनंद देतो.

Oxytocin हे फार कॉम्प्लेक्स हार्मोन आहे, यावर अजून अभ्यास होणे फार गरजेचे आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.