fbpx
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

विमानाने प्रवास करताना टेक ऑफ च्या वेळी थोडे झटके लागणे ही खूप सामान्य गोष्ट आहे, पण काही लोक त्या घटनेच्या वेळी खूपच घाबरून जातात आणि आता विमान कोसळणार अशी चिंता करू लागतात. त्यांचे श्वसन एकदम जलद होते, छातीत कळ आल्यासारखे वाटू लागते, घाम फुटून येतो तर हृदयाचे ठोके देखील वाढतात. अनावश्यक चिंतेमुळे उद्भवणाऱ्या या परिस्थितीला panic attack म्हणतात. panic attack ची लक्षणे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची असतात.

Panic Attack ची लक्षणे –
✳️ जलद गतीने श्वसन
✳️ धाप लागणे
✳️ खूप घाम येणे
✳️ शरीराचा थरकाप होणे
✳️ मळमळ आणि उलटी ची भावना
✳️ Cramp येणे
✳️ चक्कर येणे
✳️ छाती गच्च झाल्यासारखे वाटणे
✳️ हृदयाचे ठोके वाढणे
✳️ शरीर आणि विचारांवर असलेला ताबा सुटणे
✳️ अचानक गरम होणे किंवा थंडी वाजणे
✳️ हात आणि पायाला मुंग्या येणे किंवा सुन्न होणे

Panic Attack ची सुरुवात कोणत्याही वेळी होऊ शकते. प्रत्येक व्यक्ती मध्ये वरील सर्व लक्षणे असतीलच असे नाही, पण वरीलपैकी किमान 4 लक्षणे असल्यास त्याला आपण panic attack म्हणू शकतो. अटॅक साधारण 5 ते 20 मिनिटे लांब असू शकतो, साधारण 10 मिनिटे हा कॉमन पिरियड आहे. Panic Attack ची पुनरावृत्ती व्यक्तीनुसार वेगवेगळी असते, काहींना तासाभरात 3 अटॅक येतात तर काहींना दिवसातून, आठवड्यातून किंवा महिन्यातून 1 येतो. ज्यांना सतत Panic Attack येतात ते लोक सवयीने मानसिक पूर्वतयारी करून ठेवतात.

हार्ट अटॅक आणि Panic Attack ची लक्षणे सारखीच असतात, त्यामुळे बरेचदा लोक कन्फ्युज होतात. पण दोघांमध्ये एक फरक आहे तो म्हणजे हार्ट अटॅक मध्ये हृदय पिळल्यासारखे आणि त्यावर प्रेशर असल्या सारखे वाटते तर Panic Attack मध्ये छातीवर कुणी वार करत आहे असे वाटते. पण Panic Attack मध्ये स्ट्रेस चे प्रमाण आणि शारीरिक एक्सरक्शन मुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता देखील जास्त असते. त्याच प्रमाणे अटॅक नंतर खूप थकवा देखील जाणवतो.

Panic Attack ची कारणे

Panic Attack ची कारणे अजूनही अज्ञात आहेत पण त्याबद्दल अनेक थियरी आहेत, जसे मेंदू मधील केमिकल imbalance किंवा जेनेटिक आजार. Panic Attack चे ट्रिगर कोणतेही असू शकतात जसे एखादी ठराविक व्यक्ती, परिस्थिती किंवा जागा इत्यादी. मानसिक परिस्थिती आणि आजार जसे anxiety आणि डिप्रेशन तसेच मूड डिसऑर्डर, कोणत्याही विषयाचा अतिरिक्त स्ट्रेस आणि overthinking त्याच बरोबर शारीरिक आजार जसे थायरॉईड, हृदयरोग, श्वसन संबंधीचे आजार, अल्कोहोल, निकोटिन आणि caffain चे अती सेवन, औषधींचा साईड इफेक्ट देखील ह्या Panic Attack चे कारण असू शकते.

Panic Attack साठी तणावपूर्ण नोकरी किंवा काम, नुकतेच झालेले ब्रेकअप, ट्रॉमा आणि अचानक सोडलेले ड्रग्स आणि अल्कोहोल देखील कारणीभूत असू शकते.

Panic अटॅक झोपते देखील येऊ शकतात, त्यामुळे लोक झोपेतून खडबडून जागे होतात. तरुण आणि पौगंड अवस्थेतील व्यक्तींना Panic Attack सतत येत असतील तर त्यांना OCD, Anxiety, किंवा अन्य मूड डिसऑर्डर, व्यसनाधीनता आणि eating डिसऑर्डर होण्याची शक्यता जास्त असते.

Panic Attack साठी ट्रीटमेंट

ज्या व्यक्तींना Panic Attack येतात ते सवयीने ट्रिगर करणाऱ्या गोष्टी, जागा किंवा घटना avoid करायचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये बदल करतात. परंतु यामुळे त्यांच्यात फोबिया निर्माण होण्याची भीती असते. उदा. रिव्हर राफ्टिंग करताना कुणाला Panic Attack आला तर ते नंतर पाण्यात जाणे टाळतात, त्यांच्यात aquaphobia म्हणजेच hydrophobia निर्माण होतो.

CBT चा वापर करून ट्रिगर संबंधीचे विचार बदलता येतात, त्याचसोबत व्यायाम, ध्यान आणि mindfullness – दीर्घ श्वसन, योगा, मसाज यांचा वापर करून स्ट्रेस कमी करता येतो त्यामुळे Panic Attack चे प्रमाण कमी होऊ शकते. इतकेच नव्हे तर काही केसेस मध्ये psychiatrist डिप्रेशन आणि anxiety कमी करणारी औषधे देतात.

Panic Attack हाताळायची सवय होते तर ट्रीटमेंट का घ्यावी ?

Panic Attack ची frequency जर जास्त असेल तर त्याला panic डिसऑर्डर चे रुप प्राप्त होते, व्यक्ती मध्ये अनेक प्रकारचे फोबिया निर्माण होतात. त्यामुळे ते सोशल interaction कमी करतात आणि एकलकोंडे होतात. त्यामुळे स्ट्रेस, डिप्रेशन वाढते. बोलायला कुणी नसल्यामुळे पुढे आत्महत्या करायचे विचार देखील येऊ शकतात. त्यामुळे याला दुर्लक्ष करणे धोक्याचे असते.

Panic Attack रोखण्यासाठी चे उपाय

✳️ श्वसन – योग्य प्रकारे दीर्घ श्वसन करणे, श्वास घेणे आणि सोडणे याकडे लक्ष द्या. Panic अटॅक आल्या नंतर दीर्घ श्वसन केल्याने हार्ट अटॅक चे चांसेस देखील कमी होतात.
✳️ ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवा.
✳️ जास्त प्रमाणात मद्यपान, धूम्रपान करू नका, कॉफी आणि अन्य caffain असलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी करा.
✳️ Visualization – डोळे बंद करून मनात आवडती memory आठवा किंवा आवडते ठिकाण इमॅजिन करा, एक सुंदर शांत जागेचे चित्र काढा, त्यामुळे आपली parasympathetic nervous सिस्टीम व्यस्त होते आणि शरीर रिलॅक्स होते.

Panic Attack आणि Anxiety attack मधील फरक.

बरेच लोक दोघांना सारखेच समजतात पण दोघांमध्ये काही फरक आहेत,
✳️ Anxiety अटॅक हे stressful आणि threatening परिस्थिती मध्येच येतात पण Panic Attack केव्हाही येऊ शकतात.
✳️ Anxiety अटॅक सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे असू शकतात, पण Panic Attack नेहमीच तीव्र असतात.
✳️ Panic Attack मध्ये शरीराची autonomous fight-or-flight response म्हणजेच parasympathetic nervous सिस्टीम जागृत होते त्यामुळे शारीरिक लक्षणे तीव्र असतात, पण Anxiety अटॅक मध्ये शारीरिक लक्षणे कमी असतात.
✳️ Panic Attack एकाएकी येतात तर Anxiety attack हे हळूहळू निर्माण होतात.

स्ट्रेस हे दुधारी शस्त्र आहे, स्ट्रेस जर कमी प्रमाणात असेल तर त्यातून प्रेरणा मिळते तर स्ट्रेस वाढल्यास अनेक आजार होतात. त्यामुळे स्ट्रेस वर नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.