fbpx

Perfection ला रामराम

सायंकाळी निवांत कॉफी घेत बसलो होतो, तितक्यात फोन वाजला. फोन उचलला.

समोरची व्यक्ती – नमस्कार, मी संध्या (बदललेले नाव), सर 5 मिनिटे बोलू शकते का ?

मी – हो, बोला की.

संध्या – काल घरी पाहुणे आले होते. त्यांना चहा आणि नाष्टा दिला. तर त्यातील लहान मुलाकडून चुकून टेबल वर दूध सांडले. मी लगेच ते पुसून घेतल पण तरी त्याचा डाग लाकडी टेबल वरून गेलाच नाही. पाहुणे आणि माझे मिस्टर छान गप्पा मारत होते पण माझे लक्ष टेबल कडेच जात होते, दोनदा त्यांनी माझ्याशी काही तरी बोलायचा प्रयत्न केला पण मी काय उत्तरे दिली ते ही आठवत नाही. कधी एकदा हे जातात आणि मी टेबल छान स्वच्छ करते असे झाले होते. पाहुणे गेले आणि लगेच मी क्लिनर ने तो टेबल साफ करायला घेतला, पण डाग जाता जाईना. सगळे उपाय करून झाले. असे वाटले की मी तेव्हाच लगेच साफ करायला हवे होते किंवा लहान मूल आहे तर त्याला तिथे बसू नको असे म्हणायला हवे होते. माझा मुलगा भूक भूक करत जवळ आला तेव्हा मी घड्याळ पाहिलं, 2 तास मी टेबल स्वच्छ करत होते आणि मग उशीर झाला म्हणून रात्रीच जेवण बाहेरून मागवलं.

जेवताना मिस्टर म्हणाले की संध्या तू आज पाहुण्यांशी बोलली नाहीस, नंतर पण त्या टेबल पाठी एवढी वेडी झालीस की आमच्या सोबत टीव्ही पण पाहिला नाहीस, जेवण पण बनवायचं विसरलीस. तुला नाही वाटत का की हे जास्त झाल ?

मला तेव्हा त्यांचं पटलं पण लक्ष टेबल कडेच जात होत, तुमचा perfectionism वरील लेख वाचला आणि त्याप्रमाणे माझे वागणे वाटले म्हणून फोन केला.

मी – बरं, असे नेहमी होते का ?

संध्या – हो, मला अस्वच्छता अजिबात आवडत नाही, सगळं होते तसे टापटीप लागते. नाहीतर चिडचिड होते. यावर काय पर्याय ?

मी – सविस्तर बोलू यावर, म्हणजे उपाय देणे सोपे होईल.

संध्या – ठीक आहे, धन्यवाद. 

Perfectionism बद्दल लिहिल्यानंतर अनेक लोक संपर्क करत आहेत.

Perfectionism हा कोणताही आजार नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे, पण perfection पाठी पळताना अनेकदा आपण आपले मित्र किंवा नातेवाईक, प्रिय मंडळी यांना वेळ देत नाही. अनेकदा बऱ्याच गोष्टी आपण टाळतो, खूप गोष्टी पुढे ढकलायचा प्रयत्न करतो. यामुळे आपण एकटे पडतो यावर आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, हा मंत्र आपल्या सर्वांना मदत करेल अशी आशा करतो.

संध्या सोबत बोलणे झाले आणि मग विचारचक्र सुरू झाले दुधाचा डाग तो, असा किती दिसत असेल ? अगदी जवळ जाऊन निरखून पाहिलं तर तो दिसत असेल. जे काही झालं ते काही नियोजित नव्हत, पण त्याचा परिमाण म्हणजे त्या सर्व घटनेत तिचा वेळ वाया गेला, तो एवढासा डाग तिला त्या दिवशीच्या आनंदापासून दूर घेऊन गेला. तिला हे कळलं तेव्हा वेळ निघून गेली होती.

तो टेबल वरील डाग आणि आपले दैनंदिन आयुष्य यात खूप साम्य आहे, आपले आयुष्य पण असेच imperfect, अस्ताव्यस्त आणि आपल्या नियंत्रणाबाहेर असलेले आहे. आपल्यात पण अनेक अपूर्णता म्हणजेच imperfections आहेत, कुणाचेच आयुष्य अगदी sorted नाही, मी पण अनेक लोकांना थेरपी देतो पण माझ्या आयुष्यात देखील सर्व व्यवस्थित असेल असे नाही. माणूस म्हणून आपण अनेक चुका करतो, आजूबाजूचे लोक आणि परिस्थिती यांमुळे निराश होतो, पण यातून बरेच काही शिकतो.

मग perfection चा सामना कसा करायचा ? यावर नियंत्रण मिळवायचा मंत्र कोणता ?

यासाठी असलेला मंत्र अगदी सोपा आहे, “Perfect? No. Better? Yes.” 4 शब्दांचा हा मंत्र आपली विचार प्रणाली पूर्णपणे बदलू शकतो. ज्यांना सगळं टापटीप आणि perfect हवं असतं त्यांना मंत्राचा खूप फायदा होऊ शकतो.

Perfection सोबत आपली attachment आपल्याला त्रास देणारी असते, माझ्या मते perfection हे subjective आहे. मला जे best वाटत असेल ते दुसऱ्याला कमी वाटू शकते. मी अनेक सत्रात सांगतो की perfection एक भास आहे, समजा एखादी गोष्ट करताना आपण ती कितीही छान प्रकारे केली तरी शेवटी त्यात काही ना काही कमतरता आपल्याला दिसते आणि मग पुन्हा ती अजून सुंदर कशी करता येईल या कडे लक्ष जाते, आणि आपण त्यातच अडकून जातो. त्यामुळे perfection पेक्षा better काय आहे याकडे लक्ष देणे आपल्या हिताचे असते.

जर आपण better वर्जन स्वीकारले नाही आणि perfection चा अट्टाहास करत राहिलो तर आपण कधीही समाधानी होऊ शकत नाही. आपले पालक, प्रिय लोक, मुले, सोबत काम करणारे सगळ्यांच्या बाबतीत आपण असंतुष्ट राहू आणि मग एकटे होऊन जाऊ. त्यामुळे आयुष्यात जे काही better आहे ते स्वीकारा आणि imperfection मध्ये असलेले सौंदर्य अनुभवा.

आयुष्यात निराश करणारे अनेक क्षण येतील, काही लोक किंवा घटना तुम्हाला त्रास देतील पण त्याला एक संधी म्हणून स्वीकारा. त्यासाठी खालील 3 पायऱ्या तुम्हाला नक्की मदत करतील.

✳️ संयम ठेवा – आपण आपली जुनी सवय बदलायला जात आहोत तर लगेच रिझल्ट येणार नाहीत, कुठेही खचून जाऊ नका.
✳️ 100% मिळवायला प्रयत्न करताना निकाल 80% आला तर ते देखील आनंदाने स्वीकारा. Learn to celebrate imperfections.
✳️ स्वतः बद्दल लवचिक रहा, आपण परफेक्ट असलो तरच आपल्यावर कुणी प्रेम करेल असे नाही, perfection पेक्षा भावना आणि समजून घेण्याला जास्त महत्त्व आहे हे मनाशी पक्के करा.

मनाला पटवून द्या की आयुष्यात नाते संबंध, समाधान आणि प्रेम हे सगळ्यात महत्वाचं आहे बाकी सगळे दुय्यम आहे. एकदा हे लक्षात आलं की Perfection ला राम राम करणे सहज शक्य होते.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.