fbpx

Schizoid Personality Disorder (SPD)

images.jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

Cluster A personality disorders यांच्या अंतर्गत येणारा दुसरा विक्षिप्त Personality डिसऑर्डर म्हणजे Schizoid Personality Disorder, SPD असणारे लोक सामाजिक आयुष्याबद्दल खूप उदासीन असतात, आपल्या भावना शेअर करणे त्यांना खूप कठीण जाते. SPD असणाऱ्या लोकांना आपले वागणे चुकीचे आहे असं खूप क्वचित वाटत, हा डिसऑर्डर साधारणपणे प्रौढ अवस्थेत स्पष्टपणे जाणवू लागतो, ती व्यक्ती सामाजिक आणि भावनिक जीवनापासून दूर राहणे पसंत करते त्यामुळे नाते समंध देखील तयार होत नाहीत. रोजच्या जीवनात काम करताना या डिसऑर्डर चा परिणाम त्यांच्या जीवनावर कमी प्रमाणात होतो, कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध निर्माण न केल्याने ह्या व्यक्ती सतत एकट्या असतात, त्याच बरोबर अती day dreming आणि पाळीव प्राण्यांना जीव लावणे यात ते व्यस्त असतात. यांना नोकऱ्या सुद्धा वॉचमन, ग्रंथपाल अशा solitary प्रकारच्या आवडतात.

SPD आणि schizophrenia यांचा जनुकीय समंध आहे असे एका अभ्यासात समोर आले आहे, सामाजिक उदासीनता दोन्ही प्रकारात आढळणारे लक्षण आहे, परंतु SPD असणारे लोक हे वास्तव जाणून असतात याउलट schizophrenia किंवा schizoaffective डिसऑर्डर असणारे लोक वास्तवापासून लांब असतात.

Schizoid Personality Disorder (SPD) चे symptoms
 • क्लोज रेलेशनशिप बद्दल उदासीनता.
 • सतत अलिप्त राहणे.
 • कोणत्याही प्रकारची सोशल ॲक्टिविटी न करणे.
 • प्रत्येकवेळी एकट्याने करायची कामे निवडणे.
 • शारीरिक संबंधात कमी रस असणे.
 • नातेवाईक सोडता इतर कुणाशी कोणतेच नाते तयार न करणे.
 • कुणी स्तुती किंवा निंदा केली तरी फरक न पडणे.
 • भावनांचे प्रकटीकरण न करणे.
 • स्वतःच्या भावना समजावून सांगता न येणे.
 • कमी अपेक्षा आणि छोटे ध्येय असणे.
 • मोजक्या ॲक्टिविटी मध्ये रस घेणे.

SPD चे कारण अद्याप स्पष्ट नाही परंतु ज्या व्यक्तीच्या परिवारात schizophrenia या आजाराचा इतिहास आहे त्यांना SPD ची शक्यता जास्त असते. तज्ञांच्या मते अनुवंशिकतेचे प्रमाण साधारण 30 % आहे.

Schizoid Personality Disorder (SPD) साठी उपलब्ध ट्रीटमेंट.

SPD असणाऱ्या व्यक्तीला आपण कोणत्यातरी डिसऑर्डर चा शिकार आहोत असे वाटत नाही त्यामुळे ते खूप क्वचित ट्रीटमेंट चा मार्ग निवडतात. आपले कुणीच मित्र नाही किंवा कोणतेही क्लोज रेलेशनशिप नाही या गोष्टीचा या व्यक्तींना फरक पडत नाही किंवा अन्य कुणाला मित्र परिवारात बघून यांना दुःख सुद्धा होत नाही त्यामुळे आपण विक्षिप्त वागत आहोत हे मान्य करणे यांना कठीण जाते.

SPD साठी शक्यतो कोणत्याही गोळ्या/ औषधे दिली जात नाहीत, जर या डिसऑर्डर सोबत स्ट्रेस आणि डिप्रेशन ची लक्षणे असतील तर औषधे सुचवली जातात. यांना स्ट्रेस किंवा anxiety ही दुसऱ्या लोकांसोबत काम करायचे आहे किंवा त्यांच्यासोबत काही दिवस राहायचे आहे ह्या विचाराने निर्माण होते.

Individual therapy या लोकांसाठी उपयुक्त ठरते. बराच वेळ थेरपिस्ट सोबत घालवल्यानंतर दोंघांमध्ये विश्वासाचे नाते तयार होते, त्यानंतर टॉक थेरपी द्वारे विचारत थोडा बदल करता येतो. SPD असणाऱ्या लोकांमध्ये लाँग टर्म बदल करणे कठीण असते, त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि त्यांचा स्ट्रेस कमी करणे हे थेरपी चे मुख्य काम असते. CBT चा वापर करून पेशंटच्या मनातील नकारात्मक विचार आणि अन्य लोकांसंबधीची भीती कमी करता येते. ज्यामुळे नोकरी मध्ये अन्य लोकांसोबत काम करणे त्यांना सोपे होते.

SPD असणाऱ्या लोकांमध्ये schizotypal personality disorder आणि schizophrenia डेव्हलप होण्याचे चांसेस जास्त असतात.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.