fbpx

Self hypnosis ( स्व-संमोहन)

images (1).jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

Hypnosis हा शब्द जरी वाचला तरी आपल्याला भीती वाटते, आपल्या मनाचा पूर्ण ताबा आपण प्रक्रियेत hypnotist ला दिलेला असतो. अनेकदा त्याने दिलेले सल्ले आपल्याला पटतात किंवा पटत नाहीत, introvert लोक, लहानपणी एखादा ट्रॉमा अनुभवलेले किंवा दुसऱ्यांवर विश्वास नसलेले लोक यांना थेरपिस्ट वर विश्वास ठेवणे अवघड जाते.

अनेकदा आपण गाडी चालवून घरी येतो पण रस्त्यात पाहिलेले काहीच आठवत नाही, किंवा बाहेर फिरताना आपल्याला तंद्री लागते. हा सेल्फ hypnosis चा प्रकार आहे. दिवसातून अनेक वेळा आपण असे अनुभव घेत असतो. अश्या वेळी आपल्या subconscious mind activities या आपल्या मनाचा ताबा घेतात, subconscious mind खूप शक्तिशाली आहे आणि जर आपण conscious mind कंट्रोल करू शकलो तर अनेक सकारात्मक बदल अनुभवता येतील.

Self hypnosis हा संमोहन शास्त्राचा सर्वात harmless मार्ग आहे, या मार्गाने थेरपिस्ट शिवाय आपल्या विचारांवर आणि मनावर पूर्ण ताबा मिळवता येतो. स्वतःच्या विचारांना ताब्यात ठेवणे, डिप्रेशन, स्ट्रेस तसेच वजन कमी करणे, व्यसन सोडवणे असे सकारात्मक बदल तर व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता, कॉन्फिडन्स वाढणे, प्रेझेंटेशन स्किल वाढणे असे अनेक फायदे self hypnosis मुळे होतात.

सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या conscious mind ला शांत करणे जेणेकरून subconscious mind जे आपल्याला intution देत असते, आपल्या साठी काय योग्य, काय अयोग्य हे सांगत असते त्याला आपल्या सर्व विचारांचा ताबा मिळवता येईल, याने सर्व निर्णय सकारात्मक आणि फलदायी होतील.

Self hypnosis करणे अजिबात कठीण नाही, पण ती अवस्था मिळवायला प्रयत्न आणि सातत्य दोन्हीची आवश्यकता असते, दिवसातून साधारण 15 मिनिटे वेळ आणि इच्छाशक्ती यांच्या आधारे आपण स्व संमोहन करू शकतो. कोणतीही औषधे किंवा गोळी यांची आवश्यकता लागत नाही, यात कोणतीही परफेक्ट कंडीशन नसते आपण फक्त प्रयत्न करायचे आणि आपले मन आपली साथ देते.

Self Hypnosis चे स्टेप्स
 • एक शांत जागा शोधा, जिथे तुम्ही 5 मिनिट शांत बसू शकता.
 • आपला फोन सायलेंट किंवा बंद करा, शकतो लहान मुले किंवा जास्त आवाज असलेल्या जागा avoid करा.
 • पाठ सरळ असणे आणि पाठीला सपोर्ट असणे आवश्यक आहे.
 • एकदम ताठ बसा, पाय सरळ ठेवा ( क्रॉस नको).
 • पूर्ण लक्ष श्वासावर द्या. inhale आणि exhale मूव्हमेंट नोटीस करा.
 • आता डोळे बंद करून घ्या, आणि श्वास आत येताना आणि बाहेर जाताना पूर्ण अनुभव घ्या.
 • मनात कोणताही विचार आला की उदा. आत्ता उठावे, फोन चेक करावा ई. तर पुन्हा श्वासावर लक्ष द्या. ( प्रयत्न आणि सातत्य हवे)
 • पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित झाले की मग शरीराचा भार सोडून द्या. तुम्हाला वाटेल की जिथे तुम्ही बसले आहात त्या खुर्ची मध्ये sink होत आहात.
 • पूर्ण निवांत झालात की मग सेल्फ affirmation मनात रिपीट करत रहा, सेल्फ affirmation बद्दल माहिती आणि गाईड माझ्या वॉल वर उपलब्ध आहे.
 • सुरू करताना 5 मिनिटाचा टायमर लावा.
 • 5 मिनिट पूर्ण झाले की मग हळू हळू शरीराची हालचाल करा,3 मोठे श्वास घ्या आणि मग 10 ते 1 उलटे मोजा मग डोळे उघडा आणि थोडे पाणी प्या.
 • तुम्हाला शरीरात एक एनर्जी चा संचार झाल्याची अनुभूती येईल. ती जागा लगेच सोडू नका, अजून 2- 3 मिनिट तिथेच बसा.
 • दिवसातून 3 वेळा ही प्रॅक्टिस करा.

अनेक लोक ही क्रिया आणि meditation मध्ये गोंधळ करतात, या प्रकारात आपण आपले मन आणि शरीर दोन्ही actively कंट्रोल करतो त्यामुळे result लवकर येतात.

सुरवातीला 5 मिनिटे शक्य नसल्यास 3 मिनिटांनी सुरुवात करा, सातत्य ठेवल्यास तुम्हाला अनेक सकारात्मक बदल दिसू लागतील.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.