fbpx
images (2).jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print


जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत तुम्ही अन्य कुणावर प्रेम करूच शकत नाही.

सेल्फ लव्ह हा शब्द आपण अनेकदा वाचलेला असतो पण त्याचा अर्थ समजून घ्यायचा आपण प्रयत्न करत नाही, आपल्या शरीराला पोषण मिळावे म्हणून आपण चांगला आहार घेतो तसेच मनाला पोषण मिळावे, प्रेम आणि यश मिळावे, म्हणून सेल्फ लव्ह अत्यावश्यक आहे.

जोपर्यंत आपण स्वतःवर बिनशर्त प्रेम करत नाही तोपर्यंत आपण जगात कुणावर प्रेम करू शकत नाही, जर आपण स्वतःवर काही विशिष्ठ कारणामुळे प्रेम करत असू तर दुसऱ्यावर बिनशर्त प्रेम करता येत नाही. सेल्फ लव्ह ची संकल्पना आपल्या नकळत बालपणी आपल्या मनात रुजत जाते. आपल्या भोवती जर आपली काळजी करणारे लोक असतील तर सेल्फ लव्ह बहरत जाते आणि टोमणे मारणारे किंवा कमी लेखणारे लोक असतील तर या उलट कॉम्प्लेक्स डेव्हलप होतो.

सेल्फ लव्ह म्हणजे चांगले कपडे घालणे, सुगंधी डिओ किंवा परफ्यूम वापरणे, मेकअप करणे आणि माझे स्वतःवर प्रेम आहे असे मिरवणे अजिबात नाही. अनेक शारीरिक आणि मानसिक कृतींचा अंतर्भाव सेल्फ लव्ह मध्ये होत असतो. मी अनेक लोक पहिले आहेत जे खूप छान कपडे घालतात पण सेल्फ लव्ह बद्दल अज्ञानी आहेत. सेल्फ लव्ह असणे म्हणजे स्वार्थी असणे असे अजिबात नाही. उलट स्वतःवर प्रेम असलेला व्यक्ती दुसऱ्यांचे जीवन सुखद व्हावे म्हणून प्रयत्न करत असतो.

सेल्फ लव्ह चे 4 मुख्य घटक आहेत.
 • सेल्फ awareness
 • सेल्फ वर्थ
 • सेल्फ इस्टीम
 • सेल्फ केअर

ह्या चारही घटकांमधील एक ही अनुपस्थित असेल तरीही सेल्फ लव्ह पूर्ण होऊ शकत नाही, सेल्फ लव्ह डेव्हलप करणे म्हणजे राक्षसाचा सामना करण्या सारखे आहे त्यामुळे अनेक लोक यासाठी प्रयत्न करत नाहीत. अनेक लोकांना स्वतःशी बोलायची किंवा आवडत्या सवयी सोडायची इच्छा नसते. अनेकदा प्रिय व्यक्ती साठी आपण आपल्या सेल्फ लव्ह सोबत तडजोड करतो, स्वतःला कमी समजतो त्यामुळे आपल्या मनावर वाईट परिणाम होतात.

सेल्फ awareness – आपल्या विचारांच्या प्रोसेस बद्दल माहिती ठेवणे, कोणत्या विचारांनी आपला मूड कसा बदलतो, किंवा विशिष्ट भावना आपल्या वागणुकीला कसे नियंत्रित करतात. कोणत्या विचारांनी राग येतो, कोणते विचार एखादी विशिष्ट कृती करायला आपल्याला भाग पडतात हे नीट समजून घेणे. आपण नेमके कधी खुश होतो याची माहिती ठेवणे. स्वतःच्या भावनांना एक त्रयस्थ व्यक्ती बनून समजून घेणे ही सेल्फ लव्ह ची पहिली पायरी आहे. यामुळे आपला इमोशनल इंटेलिजन्स पण वाढतो, असे analyze केले की आपले ट्रिगर पॉइंट आपल्याला समजतात आणि परिस्थितीला कसे सामोरे जायचे ते ठरवणे सोपे जाते. सेल्फ अवरेनेस साठी विचार, अँक्शन्स आणि इमोशन्स ची नोंद ठेवणे महत्वाचे आहे.

सेल्फ वर्थ – समाजात होणाऱ्या नकारात्मक घटना आणि लोकांचा judgemental स्वभाव यामुळे आपण नकारात्मक आणि वाईट गोष्टींवर जास्त फोकस करतो, बरेचदा आपली किंमत ही आपण दुसऱ्यांच्या चष्म्यातून ठरवत असतो. म्हणून ही संकल्पना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपण आत्ता पर्यंत काय मिळवले किंवा काय गुण आपल्यात आहेत या गोष्टी बाजूला ठेवून स्वतःची किंमत करणे म्हणजेच सेल्फ वर्थ. कोणतीही बाहेरची गोष्ट ही आपली value ठरवत नाही, जर तुम्हाला तुमची value शोधायची असेल तर डोळे बंद करून तुम्ही केलेल्या गोष्टी आठवा ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळाले.

सेल्फ इस्टीम – सेल्फ वर्थ एकदा नीट समजली की आपली सेल्फ इस्टीम विकसित होऊ लागते, सेल्फ इस्टीम पुढील घटनांशी deal करत असते – लहानपणी आपल्याला मिळालेली वागणूक आणि प्रेम, आपल्या सोबतच्या लोकांची achivment आणि त्यांच्या तुलनेत आपण केलेली कामगिरी. आपण कोण आहोत, कुठे आहोत आणि का आहोत हे पूर्णपणे सेल्फ इस्टीम वर अवलंबून असते. आपल्या मनाला सतत सांगत रहा की मी माझे अस्तित्व सिद्ध करायला इथे नाहीये किंवा स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला आपल्याला काही करून दाखवायची गरज नाहीये.
सेल्फ इस्टीम विषयी अधिक वाचा : https://www.mysbsindia.com/articles/self_esteem/

सेल्फ केअर – हा घटक शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आयामांमध्ये काम करतो, हेल्दी जेवण घेणे, स्वच्छ आंघोळ करणे, पाणी पिणे, आपली तब्येत चांगली राहावी म्हणून व्यायाम करणे यासोबतच आपल्या आवडीच्या गोष्टी करणे, चांगले कपडे घालणे, आवडीचे संगीत ऐकणे, चित्रपट बघणे, चांगली कंपनी शोधणे असे सगळे सोपे मार्ग यात येतात. स्वतःची काळजी घेणे हे बाकी 3 मार्गांचा तुलनेत सहज आणि सोपे आहे.

रोज स्वतःला पुढील प्रश्न विचारा:
 • ज्याचं स्वतःवर प्रेम असत तो काय काय करेल ?
याची जी उत्तरे तुम्हाला सुचतील ती लिहा आणि ती सत्यात आणायचा प्रयत्न करा.
तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि तो आवाज जो मार्ग सुचवेल तो फॉलो करायचा आहे कारण कधी कधी तो मार्ग तुमच्या आवडीचा नसेल किंवा तुमच्या आवडत्या व्यक्ती पासून लांब नेणारा सुद्धा असू शकेल.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.