fbpx
images.jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

Serotonin सुद्धा dopamine सारखेच एक neurotransmitter आहे, आपली मज्जा संस्था किंवा सेंट्रल नर्व्हस सिस्टीम आणि ह्या हार्मोन चे नाते सर्वश्रुत आहे. serotonin हे शरीरात अनेक कामे करत असते. मेंदू मध्ये असणारे serotonin हे आपला मूड आणि मेमरी यांचे नियंत्रण करते परंतु या रसायना विषयी एक महत्वाची बाब म्हणजे शरीरात सर्वात जास्त प्रमाणात हे आतड्यांमध्ये आढळते. आतडे serotonin ची निर्मिती करतात आणि अन्नपचन प्रक्रियेत सुद्धा या रसायनाचा मोठा वाटा असतो.

त्याचप्रमाणे आपली झोप नियंत्रण करणे, सेक्शुअल फंक्शन, रक्त गोठवणे, हाडांची मजबुती असे अनेक घटक सुद्धा याच रसायनाच्या प्रभावात असतात. त्यामुळे ह्या रसायनाची पातळी योग्य असणे खूप गरजेचे असते.

Serotonin चे कार्य :
हे रसायन आपला मूड सांभाळणे ते अन्नपचन अश्या मुख्य शारीरिक आणि मानसिक कामांमध्ये महत्वाचे कार्य करते.

Mood – Serotonin ला सामान्य भाषेत फील गुड हार्मोन म्हणतात, आपला मूड नियंत्रण करण्यात हे रसायन खूप महत्त्वाचे ठरते, हे रसायन आपल्या मेंदूत अन्य रसायने तयार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते. डिप्रेशन किंवा anxiety साठी selective serotonin reuptake inhibitors (SSRIs) दिले जातात ज्यांचं मुख्य काम serotonin ची पातळी नियंत्रित करणे असते.

Digestion – Serotonin आपल्या पचनसंस्थेत खूप महत्वाचे काम करते, आपण पुरेसे अन्न घेतले की भुकेची भावना कमी करणे हे पाहिले काम तसेच चुकून काही अपायकारक खाल्ले की आपले आतडे अधिक प्रमाणात serotonin तयार करतात आणि त्यामुळे ते अन्न बाहेर टाकण्यासाठी मदत होते, वाढेलेली serotonin ची पातळी मग आपल्याला मळमळ / उलटीची भावना निर्माण करते आणि अपायकारक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. ( मळमळ कमी करणारे औषध हे पोटातील serotonin रिसेप्टर चे काम कमी करते, ज्याने रसायन कमी तयार होते आणि उलटी / मळमळ कमी होते)

Sleep – Serotonin आणि झोप यांचा संबंध याबद्दल अनेक संशोधनामध्ये परस्पर विरोधी मते जास्त आहेत, पण आपण किती आणि कसे झोपते ( REM की deep स्लीप) यासाठी नक्कीच serotonin आणि सोबत dopamine हे दोन्ही हार्मोन जबाबदार असतात. झोप नियंत्रण करण्याचे काम मुख्यत्वे melatonin या हार्मोन चे आहे पण याची निर्मिती ही serotonin वरच अवलंबून असते. त्यामुळे serotonin ची कमतरता किंवा अधिक उपलब्धता झोपेच्या पॅटर्न ला influence करतात.
याच serotonin आणि melatonin यांच्या नात्यामुळे निद्रानाश (insomnia) होतो.

Blood clotting – आपल्याला जखम झाली की रक्तातील प्लेटलेट्स Serotonin तयार करतात ज्यामुळे जखम भरून निघायला मदत होते, केशिका किंवा arterioles यांना narrow करायचे काम हे रसायन करते ज्यामुळे रक्त वाहण्याचे प्रमाण कमी होते या प्रक्रियेला मेडिकल language मध्ये vasoconstriction म्हणतात.

Bone Density – रिसर्च ने सिद्ध केले आहे की serotonin चा प्रभाव हाडांच्या घनतेवर ( Density) होतो, आपल्या पोटात जर serotonin चे प्रमाण जास्त असेल तर हाडांचा ठीसुळपणा वाढीस लागतो आणि osteoporosis सारखे आजार होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे डिप्रेशन मध्ये शक्यतो SSRI औषधे घेतल्यास हाडांची ठीसुळता वाढते आणि फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे जर परिवारात कुणाला osteoporosis असल्यास अथवा आपले स्मोकींग चे प्रमाण जास्त असल्यास SSRI – अँटी डिप्रेशन गोळ्या घेण्याआधी डॉक्टरांशी चर्चा करून घ्यावी.

Sexual Function – कामवासना ही serotonin आणि dopamine यांच्या परस्पर संबंधांचा रिझल्ट असते. दोन्ही हार्मोन जर प्रमाणात असतील तर बॅलन्स सेक्शुअल लाईफ जगता येते पण समजा जर यांचे प्रमाण कमी जास्त झाले तर अनेक आजार उद्भवतात. 2017 मध्ये एका बाई मध्ये serotonin चे प्रमाण जास्त आणि dopamine चे कमी असे आढळले होते, तिचे निदान सेक्स मध्ये रुची नसणे म्हणजेच hypoactive sexual desire disorder (HSDD) करण्यात आले. म्हणजेच Serotonin जर जास्त वाढले तर त्याचा सेक्शुअल फंक्शन वर देखील परिणाम होतो.

Serotonin कमी असण्याची कारणे –
डिप्रेशन किंवा सतत लो फील करणे यातून serotonin चे प्रमाण कमी आहे हे सहज जाणवते, पण फक्त हे रसायन कमी आहे म्हणून वरील गोष्टी होतीलच असे नाही, डिप्रेशन साठी अनेक हार्मोन कारणीभूत असतात. पण serotonin ची कमतरता असल्यास कमजोर पचनसंस्था, बिघडलेली झोप, विनाकारण चिडचिड असे अनेक symptoms आपल्याला दिसू लागतात.

serotonin च्या कमतरतेची काही ठराविक कारणे अद्याप उपलब्ध नाहीत परंतु दोन उपप्रकार यात नक्की सापडतात.
 • Serotonin ची कमी निर्मिती – ही एक शारीरिक प्रक्रिया आहे यात शरीर या रसायनाची निर्मिती योग्य मात्रेत करत नाही, व्हिटॅमिन B-6 आणि व्हिटॅमिन D यांची कमतरता हे मुख्य कारण असू शकते. त्याच बरोबर प्रथिनांचे सेवन ही वाढवणे गरजेचे आहे.
 • सेरोटनीन चा अकार्यक्षम वापर – हे खूप क्वचित घडते, शरीरात ( मेंदूत आणि आतड्यांमध्ये) serotonin receptors ची संख्या कमी असणे किंवा रसायनाचे शोषण आणि विघटन खूप लवकर होणे ही कारणे असू शकतात.

Serotonin कसे वाढवावे ?
देप्रेशन चा समंध मेंदू मधील केमिकल च्या imbalance सोबत असतो, त्यात serotonin चा वाटा सर्वात मोठा असतो, मेंदू मधील serotonin किती प्रमाणात वाढले की मग व्यक्तीला हॅप्पी वाटेल किंवा त्याचा मूड चांगला राहील आणि डिप्रेशन चे symptoms कमी होतील याचा अभ्यास करून अँटी डिप्रेशन पिल्स दिल्या जातात. त्याबद्दल अधिक माहिती psychiatrist कडे मिळेल. कधीही कोणतीही अँटी डिप्रेशन पिल स्वतः घेण्याचा प्रयत्न करू नये तसे करणे खूप धोकादायक आहे.

त्याचबरोबर अन्न आणि सूर्यप्रकाश हे देखील नैसर्गिक घटक आपली serotonin ची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकतात. अन्नातून आपल्याला serotonin मिळते पण शरीराला ते मिळवण्यासाठी अन्य घटकांची आवश्यकता असते जसे Tryptophan, vitamin B6, vitamin D, and omega-3 fatty acids खालील गोष्टी आपल्या आहारात असल्या तर ही पातळी नियंत्रित राहायला मदत होते.
 • केळी
 • कडधान्ये
 • अंडी
 • हिरव्या पालेभाज्या
 • अक्रोड, सूर्यफूल किंवा करडई अश्या बीया
 • मासे
 • दही किंवा अन्य प्रोबायोटिक
आपले पचन व्यवस्थित असेल की आपोआप serotonin ची उत्पत्ती ठीक होते. शरीरातील 95% serotonin पोटातच तयार होते त्यामुळे healthy batcteria पोटात असणे गरजेचे ठरते दही हा त्याचा उत्तम सोर्स आहे.

व्यायाम – शारीरिक हालचाल आणि व्यायम यांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राहते. आपण आठवड्यातून किमान 200 मिनिट व्यायाम करायला हवा ज्यात चालणे, सूर्यनमस्कार असे अनेक घटक असायला हवे.

सूर्यप्रकाश – व्हिटॅमिन D साठी कोवळ्या उन्हात जाणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून किमान 10 मिनिट सकाळी उन्हात चालणे किंवा बसणे लाभदायक ठरते.

अती serotonin चे दुष्परिणाम –
कोणतेही सेल्फ मेडिकेशन हे घातक असते त्यामुळे serotonin वाढवणारे suppliment घेताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी सांगितलेल्या मात्रेतच ते घ्यावे. नाहीतर उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक किंवा फीट येणे/ आकडी येणे असे दुष्परिणाम जाणवतात.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.