fbpx

आत्महत्येचे signs कसे ओळखावे ?

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

कुणीतरी आत्महत्येचा विचार करत आहे हे त्याच्या वागणुकीतून किंवा बोलण्यातून कसे समजून घ्यावे हा प्रश्न खूप जणांनी विचारला, प्रत्येक व्यक्तीची विचारपद्धती वेगळी असते, काही लोक आत्महत्येचा विचार वागण्यातून किंवा बोलण्यातून सगळ्यांसमोर मांडतात तर काही लोक ते विचार मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवणे पसंत करतात.

कुणाच्या मनात नेमके काय सुरू आहे जाणून घेणे निव्वळ अशक्य आहे, पण आपल्या परिवारातील किंवा ओळखीच्या व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवली जर त्यांच्याशी मन मोकळे पणाने बोला. आपण असे प्रश्न विचारला तर ती व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होईल की काय असा आपला समज होतो, पण हा एक गैरसमज आहे. उलट योग्य वेळेत त्यांस असे प्रश्न विचारले तर त्यांची मदत होऊ शकते..

आत्महत्येच्या काही कॉमन signs –

दुसऱ्याची आत्महत्या करण्याची कारणे आपल्याला नेहमीच पटतील असे नाही, अनेकदा ती कारणे खूप शुल्लक वाटू शकतात. जर आपले परिचित लोक पुढीलपैकी कोणतेही sign दाखवत असतील तर त्यांना मदतीची गरज आहे हे समजून घ्यावं.

✳️ आपण निराश आणि नालायक आहोत असा संदर्भ असणारे बोलणे, आपण कशात तरी अडकले आहोत असा समज.
✳️ जगण्यात काही अर्थ नाही अशा आशयाचे बोलणे.
✳️ बंदूक किंवा विष कुठे मिळेल असे मित्रांना विचारणे किंवा इंटरनेट वर शोधणे.
✳️ निद्रानाश किंवा अती झोप.
✳️ खूप भूक लागणे किंवा अजिबात खायची इच्छा न होणे.
✳️ Mood स्विंग्ज – क्षणात खुश तर क्षणात दुःखी होणे.
✳️ समाजात मिसळणे टाळणे, एकटे राहणे पसंत करणे.
✳️ जवळचे मित्र नसणे, प्रिय व्यक्तीशी बोलणे देखील टाळणे.
✳️ बेजबाबदार वागणूक
✳️ अती प्रमाणात चिंता करणे, चिडचिड करणे किंवा हिंसक होणे.
✳️ नुकतीच प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा ती व्यक्ती दुरावली जाणे.
✳️ आधी कधीतरी आत्महत्येचा विचार केलेला असणे.
✳️ दारू आणि ड्रग्स चे अती सेवन करणे.

कोणत्याही signs शिवाय कुणी आत्महत्या करू शकते का ?

हो, प्रत्येक वेळी व्यक्तीच्या वागण्याबोलण्यात कोणतेही वेगळेपण जाणवत नाही, Impulsive म्हणजेच आवेगात निर्णय घेणारे लोक स्ट्रेस किंवा तीव्र भावना सहन न झाल्यास आत्महत्या करतात. ( 13 वर्षाच्या मुलीने मोबाईल दिला नाही म्हणून केलेली आत्महत्या) आपण दुसऱ्यावर ओझे आहोत किंवा आपली परिस्थिती बदलणार नाही, सतत अपयश आल्या मुळे आपण जगाला तोंड दाखवायला लायक नाही असे समज देखील व्यक्तीला समाजापासून दूर नेतात त्यामुळे यांच्या मनातील विचार कुणाला समजून येत नाहीत.

कुणी मृत्यू बदल बोलत असेल ती व्यक्ती आत्महत्या करू शकते का ?

मृत्यू हा विषय आपल्याकडे नेहमीच टाळला जातो, त्यावर बोलणे देखील चुकीचे समजले जाते, पण या विषयावर बोलणे म्हणजे त्या व्यक्तीला जीवनाचा कंटाळा आला आहे असे नसते. त्यामुळे मनाने अर्थ न लावता व्यक्ती सोबत बोलून त्याच्या मनात काय आहे हे काढून घेणे गरजेचे आहे.

नात्यांमधील भांडणात आत्महत्येची धमकी कशी समजून घ्यावी ?

नवरा बायको किंवा प्रियकर आणि प्रेयसी चे भांडणं यात वाद विकोपाला गेला की मी स्वतःच बरंवाईट करून घेईन असे शब्द सहज ऐकायला मिळतात. अश्यावेळी खरच आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती स्ट्रेस मुळे आजूबाजूला असलेले मार्ग वापरून स्वतःला harm करण्यासाठी पुढे येते, पण फक्त धमकी देणारी असेल तर ती एकाच जागी उभी राहून पुन्हा पुन्हा धमकावत असते.

आपण धोक्यात आहोत हे कसे ओळखावे ?

आतापर्यंत आपण दुसऱ्यांच्या दृष्टीने या विषयाकडे पाहिले पण चुकून आपल्या मनात हे विचार आले तर ते कसे ओळखावे याकडे लक्ष देऊ.

जर पहिल्यांदाच आत्महत्येचा विचार करत असाल तर ती काही अचानक येणारी भावना नाही हे समजून घेणे महत्वाचे ठरेल, याचे विचार अनेक महिने डोक्यात सुरू असतात. कधी कधी आपल्याला एका क्षणापुरते असे वाटते की हे आयुष्य संपवून टाकावे, असे विचार सुरू झाल्यास लगेच आपण मदतीसाठी समुपदेशकांना भेटावे जेणेकरून हे विचार आपल्या मनाचा ताबा घेण्याआधी नष्ट करता येतील.

स्वतःला इजा करून घेणे म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करणे असे आहे का ?

स्वतःला इजा पोहचवणे हे कायद्याच्या दृष्टीने जरी आत्महत्येचा प्रयत्न म्हणून ग्राह्य धरले जात असले तरी नेहमीच स्वतःला इजा पोहचवण्याचा उद्देश हाच असेल असे बघ. काही मानसिक आजार देखील व्यक्तीला असे करण्यास प्रवृत्त करू शकतात. कारण काहीही असले तरी सेल्फ harm हे चुकीचेच आहे.

कुणीही आत्महत्येचा विचार करत असेल तर वेळ न दवडता समुपदेशकांना भेटावे आणि आपल्या मनात काय विचार सुरू आहेत हे ते तपशीलवार त्यांना सांगावे. कोणतीही गोष्ट लपवून ठेवल्याने यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया मोठी आणि त्रासदायक होऊ शकते.

जर तुमचा मित्र किंवा परिचित जर आत्महत्येचा विचार करत असेल तर त्याला चुकीचे सल्ले देणे टाळा. ऐतिहासिक महापुरुष यांचे काम किंवा त्यांचे जीवन प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देतीलच असे नाही, कधी कधी यामुळे व्यक्ती स्वतःला अजून कमी समजू लागते आणि self esteem ची दुर्दशा होते. त्याच बरोबर अशा कुणाची मदत करण्याचे भाग्य जर तुम्हाला लाभले तर त्याचे सोशल मीडिया वर जाहीर प्रकटीकरण करू नका. तुमच्यासाठी ती सगळ्यांसोबत शेअर करायची गोष्ट असेल पण कदाचित त्यामुळे त्या व्यक्तीची आयडेंटिटी सर्वांना माहीत होऊन त्याचे मानसिक खच्चिकरण होऊ शकते. अस काही लिखाण असल्यास त्यात नाव आणि ठिकाण बदलून लिहिणे कधीही योग्य असते.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.