fbpx

निरुपयोगी सवयींचा सामना

4 ऑक्टोबर रोजी फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम सर्व्हर प्रॉब्लेम मुळे बंद रात्री 8.30 पासून चालत नव्हते. अचानक बंद झाले म्हणून मला वाटले की wifi चा प्रोब्लेम असेल म्हणून मोबाईल डाटा सुरू केला तरी हे ॲप्स चालायला तयार नव्हते. मग फोन रिस्टार्ट करणे, सिम कार्ड काढून पुन्हा टाकणे, वायफाय राउटर रिस्टार्ट करणे असे सगळे करून झाले, शेवटी न्युज चॅनल वर बातमी पाहिली आणि मग कळले की सर्व्हर प्रोब्लेम आहे.

मग अनेक महिन्यांनी twitter उघडले तिथे देखील 6 लाख लोकांनी फेसबुक चालत नसल्याचा टॅग ट्रेंड केला होता. अचानक एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला या 3 ॲप्स ची प्रचंड सवय लागली आहे. अगदी इतकी की हे चालत नसतील तर आपण प्रचंड irritate होतो आणि anxiety देखील वाढू लागते. आपला मूड कसाही असला, एकटे वाटत असेल किंवा डिप्रेस्ड असलो तरीही या तीन ॲप्स द्वारे आपल्याला काहीतरी शांती मिळेल / आपला मूड बदलेल म्हणून आपण चेक करत राहतो.

आपण एक निरुपयोगी सवय तयार केली आहे जी सवय आपल्या मूड किंवा परिस्थिती ला देखील बाजूला ठेवून आपले लक्ष त्या सवयी कडे घेऊन जात आहे. आपल्याला अनेक सवयी सहज लागतात, आपला त्यावर कोणताच डायरेक्ट कंट्रोल नसतो पण त्या सवयींचा प्रभाव दैनंदिन आयुष्यावर होत असतो. आजच्या लेखात आपण सवयी कशा तयार होतात या बद्दल माहिती घेऊ.

सवयींचे चक्र

सवय शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची असते, शारीरिक सवयी आपल्याला ज्ञात असतात पण मानसिक सवयी जसे अती विचार, चिंतन आणि जजमेंट देखील बरेचदा आपल्याला लक्षात येत नाहीत.

प्रत्येक सवय एक पॅटर्न नुसार काम करत असते.
✳️ Trigger
✳️ Behaviour
✳️ Result

Trigger – कोणतेही सवय सुरू होण्याची पहिली पायरी म्हणजे ट्रिगर, आपल्या आजूबाजूला होणारी कोणतीही घटना ज्याने आपले लक्ष वेधले जाते. याचे 2 प्रकार आहेत. बाह्य आणि अंतर्गत. बाह्य ट्रिगर म्हणजे फोन चे ऐकू आलेले नोटिफिकेशन किंवा भजी तळताना येणारा सुगंध तर अंतर्गत ट्रिगर म्हणजे चिंता, स्ट्रेस इत्यादी.

Behaviour – ट्रिगर नंतर आपण दिलेला रिस्पॉन्स म्हणजेच Behaviour. जसे फोन उचलून चेक करणे, भजी जिथे बनली आहे तिथे जाणे, डोक्याला हात लावून बसणे, चिडचिड करणे इत्यादी. ह्या गोष्टी इतक्या सहज होतात की यांची सवय आपल्याला लागत आहे हे लक्षात देखील येत नाही.

Result – ट्रिगर नुसार आपण वागत जातो, पण ती कृती/ Behaviour किती काळ चालते यावर त्यातून येणारा रिझल्ट अवलंबून असतो. मेंदू चे reward सर्किट कोणत्याही सवयीसाठी कारणीभूत असतात आणि मेंदू शॉर्ट टर्म reward वर जास्त खुश असतो कारण त्यामुळे कंटाळवाण्या आयुष्यातून आपल्याला ब्रेक मिळतो. म्हणूनच एक notofication चेक करायला फोन हातात घेतला तरी आपण फोन मध्ये फेसबुक उघडुन थोडा वेळ स्क्रोल करतो आणि तिथेच गुंतून राहतो. आणि त्याचा परिणाम आपल्याला सवय लागते.

सवय कंट्रोल कशी करावी ?

आपल्या सवयी कंट्रोल करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे त्याविषयी जागरूक असणे. प्रत्येक ट्रिगर कडे लक्ष देणे जेणेकरून Behaviour नियंत्रित करता येईल. निरुपयोगी सवय बदलण्यासाठी तिचे तोटे समजणे गरजेचे असते म्हणजे ती बदलताना मनात कोणताही संकोच नसतो.

✳️ आपली सवय तपासा – जेव्हा कधी एखादी निरुपयोगी सवय आपल्याला लागली आहे असे वाटेल तेव्हा त्याचे ट्रिगर तपासा, कोणत्या गोष्टी मुळे आपण तो कृती केली याचे निरीक्षण करा, त्या कृती मुळे आपण किती वेळ खर्च केला ? आपल्याला कसे वाटले आणि त्याचे तात्कालिक आणि दूरगामी ( short and long term) परिमाण लक्षात घ्या.

✳️ ट्रिगर – आपले मन आणि शरीर अनेक गोष्टींनी भरकटते त्यावर नियंत्रण आणणे थोडे कठीण असले तरी अशक्य अजिबात नाही. प्रत्येक भावना पाण्याच्या लाटे प्रमाणे असते. ती शून्यातून निर्माण होते आणि मग ती मोठे रूप घेते किनाऱ्याकडे येऊन पुन्हा शांत होते. जेव्हा ती रूद्र रूप तेव्हा शांत राहणे शिका म्हणजे त्या भावनेत तुम्ही वाहवत जाणार नाही. उदा. फोन चे notification वाजलेले ऐकू आले की मग आपल्याला फोन बघत नाही तोवर मन शांत होत नाही, पण जर ते इग्नोर करू शकलो तर पुढे वेळ वाया जाणार नाही.

✳️ रिझल्ट – कोणत्याही सवयीचे नकारात्मक परिणाम समजून घ्या, ती सवय आपल्यासाठी कशी धोकादायक आहे हे समजले की तिच्यातून मिळणारा आनंद देखील नकोसा वाटू लागतो. उदा. फोन मुळे तात्पुरते मन शांत होऊन बरे वाटते पण त्यामुळे कामाचा वेळ वाया जातो, अनेक कामे अपूर्ण राहतात.

एकदा निरुपयोगी सवयी समजून घेतल्या आणि आपल्या भल्यासाठी ट्रिगर इग्नोर करणे जमले की ती सवय दूर होऊ लागते, अश्या वेळी आपल्याला फायदेशीर असणारी नवीन सवय मनाला आणि शरीराला लावण्याचा प्रयत्न सुरू करायचा.

फायदेशीर सवयी म्हणजे अश्या सवयी ज्या आपल्याला नातेसंबंध दृढ करायला मदत करतील, आरोग्यावर फोकस करवतील आणि आपला कामातील परफॉर्मन्स सुधारतील. एकदा चांगल्या सवयीमुळे आपल्याला आनंद मिळू लागला की मग आपण तो आनंद सारखा अनुभवायला नवीन सवयी निर्माण करतो आणि आपले आयुष्य सुखद व्हायला मदत होते.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.